भाजपचे सोशल इंजिनीअरिंग : अजित पवारांविरुद्ध गोपीचंद पडळकर भाजपचे उमेदवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात भाजपकडून गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. गोपीचंद पडळकर धनगर समाजाचे असल्याने बारामतीत असणारा बहुसंख्य धनगर समाज पडळकरांच्या बाजूने जाईल असे बोलले जाते आहे. त्यामुळे अजित पवारांसाठी पडळकर हे काटे की टक्कर ठरणार हे मात्र निश्चित .

वंचित आघाडीचा हात पकडून राजकारणात मोठी व्यप्ती मिळवलेल्या गोपीचंद पडळकरांनी वंचित कडून लोकसभा निवडणुकीला सर्वाधिक मते घेतली. त्याचा तरुणाई मध्ये करिष्मा असून ते धनगर समाजात देखील आरक्षणाच्या आंदोलनामुळे प्रसिद्ध आहेत. त्यामुळेच त्यांना अजित पवारांच्या विरोधात उतरवले जाण्याची शक्यता आहे. पडळकर आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

२०१४ साली बारामती लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर यांना भाजपने उमेदवारी दिली होती. महादेव जानकर यांच्या पाठीशी बारामतीची जनता उभा राहिल्याने सुप्रिया सुळे यांचे मताधिक्य कमालीचे घटले होते. तेव्हा सुप्रिया सुळे अवघ्या ६९ हजार मतांनी विजयी झाल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर धनगर चेहरा देऊन भाजप अजित पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे.