गोपीचंद पडळकर संपला पाहिजे अशी महाविकास आघाडीची भावना; ‘त्या’ राड्यानंतर पडळकरांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमदेवार पळवापळीवच्या मुद्द्यावरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर तसेच शिवसेना-राष्ट्रवादी गट यांच्यात राडा होऊन पडळकर यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आलीय. काही कार्यकर्ते जखमीदेखील झाले आहेत. या घटनेनंतर गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला . गोपीचंद पडळकर संपला पाहिजे ही महाविकास आघाडीची भावना आहे असा आरोप त्यांनी केला.

मी गेल्या २ वर्षापासून राज्य सरकार विरोधात वेगवेगळ्या प्रश्नावर आवाज उठ्वतोय. त्यामुळे मला अडकवायला त्यांना दुसरं काही कारण नाही त्यामुळे मागच्या वेळीही सोलापूर मध्ये माझ्या गादीवर दगडफेक करण्यात आली होती आणि आताही दगडफेक केली आहे असे पडळकर यांनी म्हंटल

एस ती कर्मचारी संपावर असून जवळ जवळ ३३ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे त्याच्यावर बोलायला सरकार तयार नाही. या विषयावर मुंबई येथे १० तारखेला मोठं आंदोलन होईल या भीतीपोटी याला कुठेतरी अडकवून ठेवा, कलम दाखल करा आणि जेलमध्ये टाका अशा प्रकारचे यांचे नियोजन चालू आहे असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला

गोपीचंद पडळकर संपला पाहिजे अशी महाविकास आघाडीची भावना आहे मात्र इथल्या सर्व देवांचे आशीर्वाद आणि त्यांची शक्ती माझ्यासोबत आहेत लोकांचे पाठबळ माझ्या बरोबर आहे, त्यामुळे एवढा मोठा जमाव जमा होऊन देखील आम्हाला काही झालं नाही असे पडळकर यांनी म्हंटल