Monday, February 6, 2023

टक्केवारीसाठी मोफत लसीकरणाचा निर्णय वापस घेऊ नये, हीच अपेक्षा – गोपीचंद पडळकर

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील जनतेचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय सरकार कडून घेण्यात आल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं होतं त्याचप्रमाणे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील याबाबत ट्विट केलं होतं. परंतु काही वेळातच ते ट्विट त्यांनी डिलीट केल्याने विरोधकांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी यावरून आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

बिघाडी सरकारचे लाडके मंत्री आदित्य ठाकरे यांचे ट्विट वाचून आनंद झाला. पण तो काही क्षणातच विरला. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणारे तुम्ही आहात, ‘वाटाघाटीʼ आणि ‘टक्केवारीमुळेʼ लोकहितासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी जाहीर केलेला मोफत लसीकरणाचा निर्णय वापस घेऊ नये, हीच अपेक्षा, असा टोला पडळकर यांनी लगावला

- Advertisement -

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना राज्यातील जनतेचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्ट केलं होतं. मागच्या कॅबिनेटमध्ये या दराबाबत चर्चा झाली. यामध्ये एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता. असे नवाब मलिक यांनी म्हंटल होत.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.