हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यावर आलेलं महापुराचं भयंकर संकट पाहता राज्य सरकारकडून तातडीची मदत अपेक्षित होती पण ती मिळाली नाही. त्यामुळे आता तरी सरकारने पूरग्रस्तांना मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते कोल्हापूर जिल्ह्यात पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले असताना पत्रकार परिषदेत बोलत होते.
फडणवीस म्हणाले, हे नुकसान पाहता, राज्य सरकारकडून तातडीची मदत येणं अपेक्षित होतं, पण अजून पोहोचली नाही. आपत्ती आल्यानंतर तात्काळ मदत आवश्यक असते. नागरिकांच्या घर-दुकानांमध्ये चिखल घुसतो, ते सफाई करण्यासाठीही खर्च असतो. मिठापासून कपड्यांपर्यंत खराब झाले असतात. ही जी तातडीची मदत द्यावी लागते, कारण या पूरग्रस्तांकडे काहीही नसतं. आता उशीर झालाय, पण सरकारने तातडीने मदत करावी,
खरं तर या महापुराकडे आपल्याला अतिशय गांभीर्याने पाहावं लागेल. एवढा मोठा पाऊस न होता, विसर्ग न होता पाणी का साठलं यावर उपाय शोधावे लागतील. महापुरामुळे प्रशासकीय इमारती, शाळांचं नुकसान. घरांचं, दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे, असं ते म्हणाले. त्यामुळे सरकारने आता तरी मदत करावी असे फडणवीसांनी म्हंटल.