हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रेल्वे स्थानकावर खाद्य पदार्थाचे स्टॉल मोठ्या प्रमाणात लावले जातात. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर जागा राहत नाही आणि परिणामी प्रवाश्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. तसेच अपघाताच्याही घटना घडतात. त्यामुळे ही दुकानें हटवण्यासाठी रेल्वेकडून अनेक मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आता उपनगरीय स्थानकावर स्वयंपाक बनवन्यावर बंदी घालण्यात आली आहे. तर इतर ठिकाणचे सुद्धा हळूहळू बंद करण्यात येतील असे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे.
प्रवाश्यांना चांगले व आरोग्यदायी खाद्यपदार्थ देण्यासाठी रेल्वे आहे प्रयत्नशील
सध्या दिल्ली येथे लोकसभा अधिवेशन सुरु आहे. यानिमित्ताने केंद्र सरकार कडून अनेक घोषणा केल्या जातआहेत. त्यातच लोकसभेत लेखी उत्तर देताना अश्विनी वैष्णव म्हणाले की, रेल्वे स्थानकावरील स्टॉल्स आणि ट्रॉलींसह स्थिर केटरिंग युनिट्सद्वारे प्रवाशांना चांगले आणि आरोग्यदायी खाद्यपदार्थ देण्यासाठी पुरेशी तरतूद सुनिश्चित करण्यासाठी भारतीय रेल्वे नेहमी प्रयत्नशील आहे. ते पुढे म्हणाले, उपनगरीय स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या स्वयंपाकास बंदी घालण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच इलेक्ट्रिक उपकरणे, ट्रॉलीवरील पदार्थ, खाद्यपदार्थ यावर अंकुश टाकण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. असे म्हणत त्यांनी केटरिंग धोरणाचा उल्लेख केला.
शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने आणि गजानन कीर्तिकर यांनी रेल्वे स्थानकावर मिळणाऱ्या असुविधा बद्दल प्रश्न उपस्थित केले. त्यांनी विचारले की, स्थानकावर प्रवाश्यांसाठी ताजे अन्न उपलब्ध नसते. तसेच रेल्वेने गरम चहा आणि अन्न तयार करण्यासाठी स्टेशनवरील स्टॉल्स किंवा ट्रॉलींवर एलपीजी वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत का? असा सवालही त्यांनी केला. एवढेच नाही तर त्यांनी अखिल भारतीय रेल्वे खान-पॅन परवानाधारक वेलफेअर असोसिएशनने कोणत्याही इलेक्ट्रिकल इंडक्शन सेटअप नसल्यामुळे ट्रॉलीवर एकसमान एलपीजी वापरण्याची परवानगी मागितली आहे का? असे प्रश्न उपस्थित केले. त्यावर उत्तर देताना अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, असोसिएशनचे प्रतिनिधी हे गुणवत्तेवर तपासले गेले आहेत आणि त्यानुसार कारवाईही केली गेली आहे.