हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank : सध्याच्या डिजिटायझेशनच्या काळात सार्वजनिक क्षेत्रातील बँका देखील ग्राहकांपर्यंत आपली पोहोच वाढवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. या दरम्यानच आता सरकारी बँकांकडून डिसेंबरपर्यंत देशातील अनेक राज्यांमध्ये 300 शाखा उघडल्या जाणार आहेत.
या प्रकरणाशी संबंधित सूत्रांकडून सांगण्यात आले की, या शाखा 3,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या तसेच जिथे बँकेच्या सेवा अजूनही विस्तारलेल्या नाहीत अशी शहरे आणि खेड्यांमध्ये उघडण्यात येणार आहेत. डिसेंबर 2022 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. राजस्थानमध्ये जास्त शाखा उघडल्या जातील, जिथे 95 शाखा प्रस्तावित आहेत. यानंतर मध्य प्रदेशमध्ये 54 शाखा तर गुजरातमध्ये 38 शाखा आणि महाराष्ट्रात 33 तर झारखंडमध्ये 32 आणि उत्तर प्रदेशमध्ये 31 शाखा उघडल्या जातील. Bank
हे लक्षात घ्या कि, वित्त सेवा सचिवांसोबत गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत या शाखा सुरू करण्यावर एकमत झाले होते. ज्यामध्ये असे म्हटले गेले की, ज्या ग्रामीण भागात बँकिंगच्या सुविधा अजूनही उपलब्ध नाहीत, तिथे डिसेंबर 2022 पर्यंत शाखा उघडण्यात येईल. नवीन शाखा सुरू झाल्यानंतर बँकिंग सुविधा त्या भागातील लोकांपर्यंत पोहोचतील, जिथे आतापर्यंत बँकिंगच्या सुविधा पोहोचलेल्या नाहीत. Bank
कोणत्या बँकेकडून किती शाखा उघडल्या जातील ???
बँक ऑफ बडोदाने जास्तीत जास्त 76 शाखा उघडण्याविषयी सांगितले आहे, त्यानंतर SBI देखील ग्रामीण भागात एकूण 60 शाखा सुरु करणार आहे. या बैठकीत असेही सांगण्यात आले की, दुर्गम भागातही बँकांच्या नवीन शाखा सुरू केल्या जातील, जेणेकरून दुर्गम गावांना बँकिंग सुविधांचा लाभ मिळू शकेल. Bank
जन धन खात्यांचा आवाका वाढला
28 ऑगस्ट 2014 रोजी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री जन धन योजना सुरू करण्यात आली होती, ज्या अंतर्गत समाजातील मागासलेल्या घटकातील सुमारे 46 कोटी लोकांची खाती उघडण्यात आली. या योजनेमुळे ग्रामीण आणि निमशहरी भागात 67 टक्के जनधन खाती उघडण्यात आली. इतकेच नाही तर 56 टक्के खाती महिलांच्या नावावर आहेत. Bank
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://m.rbi.org.in/scripts/bs_viewcontent.aspx?Id=3657
हे पण वाचा :
HDFC Bank ने ग्राहकांसाठी सुरू केली SMS बँकिंगची सुविधा, त्याचा लाभ कसा घ्यावा ते पहा
RBL Bank च्या ग्राहकांना बचत खात्यावर मिळणार जास्त व्याज, नवीन दर तपासा
LIC ची पॉलिसी सरेंडर करण्याआधी त्यासंबंधीच्या ‘या; महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या
‘या’ Multibagger Stock ने दीर्घकालवधीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना दिला मोठा रिटर्न !!!
Wipro : ‘या’ IT कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मिळवून दिले करोडो रुपये !!!