हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Strike : नोकऱ्यांच्या आउटसोर्सिंगच्या निषेधार्थ शनिवारी ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) कडून संप पुकारण्यात आला आहे. AIBEA चे सरचिटणीस सीएच वेंकटचलम यांनी याबाबत माहिती देताना म्हंटले कि, या संपामुळे सरकारी बँकांच्या कामकाजावर परिणाम होऊ शकेल. मात्र, खासगी क्षेत्रातील बँकांना याचा फटका बसणार नाही. हे लक्षात घ्या कि, बँकांचा अधिकारी वर्ग या संपामध्ये सहभागी होणार नसला तरी बँकांमधील डिपॉझिट्स, पैसे काढणे, चेक क्लिअरिंगवर परिणाम होऊ शकेल.
याशिवाय, RBI कडून जारी करण्यात आलेल्या सुट्ट्यांच्या लिस्टनुसार या महिन्याच्या उर्वरित 12 दिवसांपैकी 4 दिवस बँकांमध्ये कोणतेही कामकाज होणार नाही. मात्र यातील अनेक सुट्ट्या या राष्ट्रीय पातळीवरील आहेत. या दिवशी संपूर्ण देशात बँकिंग सेवा बंद राहतील. तसेच काही राज्यांमध्ये प्रादेशिक सुट्ट्यांमुळे देखील बँकेच्या शाखा बंद राहतील. Bank Strike
19 नोव्हेंबर रोजी संप (Bank Strike)
पंजाब आणि सिंध बँक तसेच बँक ऑफ बडोदा सहीत अनेक बँकांकडून आपल्या ग्राहकांना 19 नोव्हेंबर रोजी संप झाल्यास सेवांवर काय परिणाम होईल याची माहिती आधीच देण्यात आली आहे.
बँकांचे कर्मचाऱ्यांचा सहभाग
गुरुवारी स्टॉक एक्सचेंजला पंजाब आणि सिंध बँकेकडून सांगितले की, जर संप केला गेला तर बँकांचे कर्मचारी त्यामध्ये सहभागी होऊ शकतात. अशा परिस्थितीत बँकेच्या शाखा/कार्यालयांच्या सामान्य कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. AIBEA चे सरचिटणीस सीएच वेंकटचलम म्हणाले की,” काही बँकांद्वारे नोकऱ्यांचे आउटसोर्सिंग ग्राहकांच्या गोपनीयतेला आणि त्यांच्या डिपॉझिट्सना धोका निर्माण करू शकते.” ते पुढे म्हणाले की,” काही बँका औद्योगिक विवाद (सुधारणा) कायद्याचेही उल्लंघन करत आहेत. कामगार अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करूनही त्यांचे व्यवस्थापन या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत आहे. तसेच व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांची जबरदस्तीने बदली केली जात आहे.” Bank Strike
नोव्हेंबर 2022 मधील बँकांच्या सुट्ट्यांची लिस्ट तपासा
20 नोव्हेंबर – रविवार साप्ताहिक सुट्टी असेल.
23 नोव्हेंबर – सेंग कुत्स्नेममुळे, शिलाँगमध्ये बँक सुट्ट्या असतील.
26 नोव्हेंबर – महिन्याचा चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील.
27 नोव्हेंबर – =रविवार असल्याने या दिवशी बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : http://aibea.in/
हे पण वाचा :
108MP कॅमेरा असलेला OPPO A1 Pro 5G स्मार्टफोन लॉन्च, किंमत अन् फीचर्स तपासा
SBI कडून कर्ज घेणे महागले, बँकेने व्याजदरात केली 0.15 टक्क्यांनी वाढ
PM Kisan FPO Yojana : खते, बियाणे अन् कृषी उपकरणांसाठी शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख, याविषयी जाणून घ्या
Train Cancelled : रेल्वेकडून आज 172 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे नवीन दर पहा