नवी दिल्ली । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 8 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान-किसान सन्मान निधीची रक्कम आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित कार्यक्रमात जाहीर केली. केंद्र सरकारने या योजनेंतर्गत 20,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम जाहीर केली असून यासाठी 9.5 कोटीहून अधिक शेतकर्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा केले आहेत.
Prime Minister Narendra Modi releases the 8th installment of financial benefit under the Pradhan Mantri Kisan Samman Nidhi (PM-KISAN) scheme via video conferencing pic.twitter.com/6P5s5Gj4Sh
— ANI (@ANI) May 14, 2021
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देशातील 9.5 कोटी शेतकर्यांच्या खात्यात आठव्या हप्त्याचे 20,000 कोटी रुपये डीबीटीमार्फत ट्रान्सफर करण्यात आले आहेत. यासह पीएम मोदी यांनी लाभार्थ्यांशी चर्चाही केली. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आतापर्यंत एकूण 11.80 कोटी शेतकर्यांची नोंदणी झाली आहे. शासनाच्या या योजनेतून एकूण लाभार्थी शेतकरी कुटुंबे 10.82 कोटी आहेत.
या योजनेंतर्गत आतापर्यंत शेतकर्यांना 2000 रुपयांच्या 7 हफ्ते मिळाले आहेत. आता 8 वा हप्ता येत आहे. 25 डिसेंबर 2020 रोजी शेवटच्या वेळी सुमारे 18000 कोटी रुपये 9 कोटी शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. या योजनेंतर्गत एखाद्या शेतकऱ्यास पैसे मिळाले नसल्यास आपण केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या हेल्पलाइनवर कॉल करून त्याविषयी माहिती मिळवू शकता.
केंद्र सरकारने भूधारक आणि अल्पभूधारक शेतकर्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी नावाची योजना चालविली आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 3 हप्त्यांमध्ये 6000 रुपये दिले जात आहेत. यासाठी सर्व माहिती pmkisan.gov.in या वेबसाईटवर देण्यात आली आहे.
आपले नाव या लिस्टमध्ये आहे की नाही ते तपासा…
सर्व प्रथम, आपल्याला पंतप्रधान किसान योजना https://pmkisan.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
वेबसाइट उघडल्यानंतर मेन्यूबार पहा आणि येथे ‘फार्मर्स कॉर्नर’ वर जा.
– आता ‘लाभार्थी यादी’ च्या लिंकवर क्लिक करा.
– आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव तपशील प्रविष्ट करा.
– यानंतर, आपल्याला Get Report वर क्लिक करावे लागेल, त्यानंतर आपल्याला माहिती मिळेल.
– शासनाकडून या योजनेचा लाभ देण्यात आलेल्या शेतकऱ्यांची नावे राज्य / जिल्हानिहाय / तहसील / गाव यांच्यानुसारही पाहिली जाऊ शकतात.
हप्ता न आल्यास ‘या’ क्रमांकावर करा तक्रार
किसान सन्मान निधीचा हप्ता न मिळाल्यास पंतप्रधान किसान समितीच्या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार दाखल करू शकतात. यासाठी आपण 011-24300606 / 011-23381092 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता. याशिवाय सोमवार ते शुक्रवार या काळात PM-KISAN Help Desk चा Email [email protected] वर संपर्क साधता येईल.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा