Government Scheme : सरकारची PDS योजना ठरणार फायदेशीर; स्वस्तात मिळणार ‘या’ गोष्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Government Scheme) दिवसागणिक वाढत जाणारी महागाई सर्वसामान्यांवर भारी पडत आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने महागाई नियंत्रित करण्यासाठी भारत ब्रँड लॉंन्च केला. भारत ब्रँडअंतर्गत किराणा सामानाची स्वस्त दरात विक्री सुरु करण्यात आली. ज्याचा फायदा साहजिक सर्वसामान्य जनतेला झाला. यानंतर आता भारत सरकार ऑनलाईन विक्रीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या Flipkart आणि Amazon सारख्या लोकप्रिय साईट्सवर निशाणा साधणार आहे. यासाठी सरकार टिकाऊ उत्पादनांची ऑनलाईन विक्री करता येईल म्हणून प्रयत्न करत आहे.

(Government Scheme) एकीकडे वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारत ब्रँड कार्यरत आहे. तर दुसरीकडे ऑनलाईन सरकारी रेशन दुकान सुरु करण्याची जोरदार तयारी सुरु आहे. या नव्या योजनेचे नाव पीडीएस (PDS – public distribution system) म्हणजेच सार्वजनिक वितरण प्रणाली असे आहे. ग्राहक टिकाऊ उत्पादन विक्रीसाठी सुरु करण्यात येणाऱ्या या ऑनलाईन सरकारी रेशन दुकानाची सध्या तज्ञांकडून चाचणी सुरु आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच सरकारी पीडीएस दुकाने सुरु होणार आहेत.

सरकारची पीडीएस योजना (PDS – public distribution system)

भारत ब्रँडनंतर सरकारची पीडीएस योजना सर्वसामान्यांना दिलासा देणारी आहे. सध्या या पीडीएस योजनेची चाचणी सुरु असून काही दिवसांतच ही दुकाने सुरु होतील. या ऑनलाइन पीडीएस साइटवर ONDC तत्त्वावर ग्राहक टिकाऊ उत्पादनांची खरेदी करू शकतील. ONDC हा सरकारने तयार केलेला एक ई- कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. ज्यावर सरकारी उत्पादने स्वस्त दरात विकली जातात. या मार्फत सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत उत्पादनांची विक्री होईल.

(Government Scheme) ऑनलाइन मार्केटच्या दुनियेत सरकारी दुकाने जोडण्यासाठी सरकारकडून पथदर्शी योजनादेखील राबवल्या जातात. या योजनांतर्गत ऑनलाइन दुकानामधून अगरबत्ती आणि टूथब्रशसारख्या इतर गरजेच्या वस्तूदेखील विकण्याची तयारी सुरु आहे. त्यामुळे आता अगदी किफायतशीर किंमतीत सामान्य नागरिकांना या ऑनलाईन साईटच्या माध्यमातून खरेदी करता येणार आहे. या प्रणालीची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. जेणेकरुन ऑनलाईन शॉपिंग करताना समस्या येणार नाही. शिवाय जे ऑनलाईन खरेदी टाळतात तेदेखील सोप्या पद्धतीने सरकारी रेशन दुकानातून वस्तू ऑर्डर करू शकतील.

‘पीडीएस’ची चाचणी कुठे सुरु आहे? (Government Scheme)

सरकारच्या पीडीएस दुकानांची चाचणी ही हिमाचल प्रदेशातील उना आणि हमीरपूर जिल्ह्यात सुरू आहे. ही चाचणी लवकर यशस्वी होईल अशी आशा आहे. चाचणीला जितक्या लवकर यश प्राप्त होईल तितक्या लवकर या प्रणालीची संपूर्ण राज्यात अंमलबजावणी केली जाणार आहे.

कोणाला होणार फायदा?

सरकारच्या कोणत्याही योजनेचा पहिला फायदा हा देशातील सर्वसामान्य नागरिकांना होत असतो. पीडीएस दुकानांची चाचणी सफल झाल्यास याचा अधिक फायदा ग्राहकांइतकाच रेशन दुकानदारांनासुद्धा होईल. कारण या योजनेत सरकार या रेशन दुकानदारांना जोडून घेणार असल्याने यातून त्यांना अधिक ग्राहक आणि अधिक नफा प्राप्ती होणार आहे.