केंद्रानं देशातील सर्व देवस्थानांकडील सोनं ताब्यात घ्यावं- पृथ्वीराज चव्हाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा । केंद्र सरकारनं देशातील सर्व देवस्थान ट्रस्टकडे पडून असलेलं सोनं कर्जरूपानं ताब्यात घ्यावं, अशी मागणी माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं देशातील अर्थकारण ठप्प पडलं असून त्याला चालना देण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी अत्यंत महत्त्वाचा उपाय केंद्र सरकारला सुचवला आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत ट्विट करत म्हटलं कि,” केंद्र सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या (World Gold Concil) अंदाजानुसार देशात १ ट्रिलियन डॉलर (किंवा ७६ लाख कोटी रुपये) इतके सोने आहे. सरकारने हे सोने १ किंवा २ टक्के व्याजाने परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावे.” असं चव्हाण यांनी केंद्राला सुचवलं आहे.

दरम्यान, मंगळवारी पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाऊनमुळं ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेमध्ये प्राण फुंकण्यासाठी २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. पृथ्वीराज चव्हाण यांनी या घोषणेचं स्वागत केलं आहे. अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी सरकारनं जीडीपीच्या किमान १० टक्के प्रोत्साहन पॅकेज द्यावं, अशी मागणी मी सातत्यानं करत होतो. तसं पाऊल सरकारनं टाकल्याबद्दल मी समाधानी आहे. आता या पॅकेजचा योग्य विनियोग होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment