हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत सरकारने रेशनकार्ड असणाऱ्यांना दरवर्षी मोफत एलपीजी सिलिंडर देण्याची घोषणा केली आहे. देशात अनेक वस्तू महाग झाल्या असून त्यांचा थेट बोजा स्वयंपाकावरील खर्चावर पडला आहे. त्याच पार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत पात्र व्यक्तींना वर्षभरात 3 गॅस सिलिंडर मोफत मिळू शकतात.
उत्तराखंड सरकारने या वर्षी मे महिन्यात अंत्योदय कार्डधारकांना 3 एलपीजी सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. मोफत एलपीजी गॅस योजनेचा एकूण 55 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांना माहिती देताना मुख्य सचिव सुखबीर सिंग संधू म्हणाले की, एकूण 1,84,142 अंत्योदय कार्डधारकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. तसेच मंत्रिपरिषदेने मागील वर्षीप्रमाणेच गहू खरेदीवर शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २० रुपये बोनस देण्याचा निर्णयही घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
काय आहे पात्रता-
लाभार्थी उत्तराखंडचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.
तसेच, पात्र लाभार्थी अंत्योदय शिधापत्रिकाधारक असावा.
अंत्योदय शिधापत्रिका गॅस कनेक्शन कार्डशी लिंक करावी लागेल.
मोफत एलपीजी सिलिंडर कसा मिळवायचा-
तुम्हाला उत्तराखंड सरकारच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला तुमच्या गॅस कनेक्शनसोबत अंत्योदय कार्ड लिंक जोडावे लागेल. हे काम या महिन्यापर्यंत म्हणजेच जुलैमध्येच पूर्ण करावे लागणार आहे. जर तुम्ही दोन्ही लिंक केले नाहीत तर तुम्ही सरकारच्या मोफत गॅस सिलिंडरच्या योजनेपासून वंचित राहाल. उत्तराखंड सरकारने योजनेशी संबंधित सर्व आवश्यक कामे पूर्ण केली आहेत. राज्य सरकारने अंत्योदय ग्राहक यादीची जिल्हानिहाय यादी तयार करून स्थानिक गॅस एजन्सींना पाठवली आहे.