व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

राजू शेट्टींच्या आमदारकीवर टांगती तलवार?? पराभूत उमेदवाराला विधान परिषदेवर नियुक्त करता येत नाही?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात नवीन माहिती पुढं आली असून यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या आमदारकी वर टांगती तलवार उभी राहिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलेल्या त्या नियमामुळे राजु शेट्टींच्या आमदारकी वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत एखादी व्यक्ती पराभूत झाली असेल तर त्याला नेमलं जात नाही अशी नवी चर्चा नव्याने सुरू झाली आहे. यात तथ्य आहे का याची शहानिशा आम्ही करतोय. जर का अडचण आली तर मुख्यमंत्री त्याबाबत निर्णय घेतील. मात्र अरुण जेटलींचा पराभव झाल्यानंतर त्यांना नरेंद्र मोदींनी राज्यसभेवर घेतलं होतं’ असे अजित पवार यांनी सांगितले.

राजू शेट्टी यांचा लोकसभेला झाला होता पराभव-

राजू शेट्टी यांनी हातकणंगले लोकसभा मतदासंघातून 2019 ची निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्यांना शिवसेना उमेदवार धैर्यशील माने यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.