मुंबई | राज्याचे राज्यपाल सदवर्तनी, सुस्वाभावी, प्रेमळ व मनमिळावू आहेत. परंतु त्यांनी 12 आमदारांबाबत जी भूमिका घेतली आहे ती राजकीय आहे. त्यांची भूमिका मनापासून नाही, त्याच्यावर नेमणूक झालेल्या पक्षांकडून राजकीय दबावात ते काम करत आहेत. परंतु राजभवानात बसलेल्या व्यक्तीने स्वतःला राजकीय प्यादे म्हणून वापरायला देवून नये. घटनात्मक पदाचे आवमूल्यन होत आहे. हायकोर्टाने काल प्रत्यक्ष नसला तरी अप्रत्यक्ष हल्ला केला असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, हायकोर्टाने सांगितले आहे, घटनात्मक प्रसंग हा राज्यापाल यांच्याकडून निर्माण होवू नये. स्वतःला राजकीय प्यादे म्हणून वापरायला देवू नये. ते पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते किंवा संघाचे प्रचारक असू शकतात. त्याविषयी आमची काही भूमिका असण्याचे कारण नाही. कारण राज्यपाल हा पाॅलिटिकल एजंट असतो केंद्राचा. घटनेनुसार ते राज्याच्या कॅबिनेटच्या अधिकारावर अतिक्रमण करत असतील. तर तो राज्याच्या अधिकारावर हल्ला आहे.
राज्यपाल यांनी दबाव झुगारून आपण स्वाभिमान असल्याची एक भूमिका घेणे गरजेचे आहे. काल राज्यपाल गृहमंत्री अमित शहा यांना भेटले. कालचा हायकोर्टाचा निर्णय गृहमंत्र्यांना समजला असेल. अमित शहांनी 370 कलम हटवून देशाची वाहवा मिळवली. तशीच जी राजकीय बंदी घातलेली आहे 12 आमदारांबाबत ती हटवा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.