ग्रामपंचायत निकाल : भाजप- शिंदे गटाची सरशी; ‘मविआ’ ला मोठा झटका

mahapolitics
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. त्यातील ६१ ग्रामपंचायतींवर सरपंचाची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर ५४७ ग्रामपंचायतीचे निकाल आज जाहीर होत आहेत. त्यातील आत्तापर्यन्त ३५२ ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये भाजप आणि शिंदे गटाला सर्वाधिक विजय मिळाल्याचे दिसत आहे.

आत्तापर्यंत जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निकालात भाजप १०४ , शिंदेगट ३० , काँग्रेस ३५ , शिवसेना २० , राष्ट्रवादी काँग्रेस ९३ आणि इतर पक्षांना ७० ठिकाणी विजय मिळवता आला आहे. राज्यात सत्ताबदल होताच महाविकास आघाडीला मोठा झटका बसल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे शिंदे गटामुळे भाजपची ताकद अजून वाढली आहे.

पक्षपुटीचा शिवसेनेला मोठा फटका-

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली. अनेक आमदार आणि खासदार शिंदे गटात सामील झाल्याने उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ झाली. त्याचाच परिणाम ग्रामपंचायत निवडणुकीतही पहायला मिळाला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आत्तापर्यतच्या निकालात अवघ्या २० ठिकाणी विजय मिळवत आला आहे तर दुसरीकडे शिंदे गटाने ३० ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकवला आहे.