Gram Suraksha Yojana द्वारे दररोज 50 रुपयांची बचत करून मिळवा 35 लाख रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gram Suraksha Yojana : जर आपण पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर Post Office आपल्यासाठी चांगला पर्याय ठरू शकेल. त्याचप्रमाणे जर आपल्याला कोणत्याही प्रकारची जोखीम नको असेल तर पोस्ट ऑफिसकडून दिल्या जाणाऱ्या लहान बचत योजना अतिशय योग्य ठरतील. हे जाणून घ्या कि, पोस्ट ऑफिसच्या ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स अंतर्गत अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. पोस्ट ऑफिसची ग्राम सुरक्षा योजना या योजनांपैकीच एक आहे. ज्यामध्ये दररोज 50 रुपये जमा करून 35 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळवता येते. चला तर मग या योजनेविषयीची सर्व माहिती जाणून घेऊयात….

Gram Suraksha Yojana: पोस्ट ऑफिस की बंपर स्कीम! रोज 50 रुपये निवेश पर मिलेंगे 35 लाख रुपये - gram suraksha yojana post office scheme invest rs 50 per day to get 35

Gram Suraksha Yojana काय आहे ???

19 वर्षे ते 55 वर्षे वयोगटातील कोणत्याही भारतीय नागरिकाला Post Office च्या या योजनेमध्ये गुंतवणूक करता येईल. यामध्ये 10,000 ते 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. तसेच गुंतवणूकदाराला मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर हप्ता भरता येईल. या योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्याला संपूर्ण 35 लाखांचा लाभ दिला जातो. तसेच गुंतवणूकदाराला 80 व्या वर्षी या योजनेची ही रक्कम बोनससह मिळते. जर गुंतवणूक करणारी व्यक्ती 80 वर्षांच्या आधी मरण पावली तर त्याच्या नॉमिनीला ही रक्कम दिली जाते. Gram Suraksha Yojana

Gram Suraksha Scheme । ग्राम सुरक्षा योजना । ग्राम सुरक्षा स्कीम । Whole Life Assurance।

अशा प्रकारे मिळवा बोनस

या योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला 4 वर्षांनंतर बोनसची सुविधा मिळते. तसेच ही पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून 3 वर्षांनंतर ही पॉलिसी सरेंडर देखील करता येऊ शकते. या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यानंतर 5 वर्षांनी बोनस देखील मिळतो. Gram Suraksha Yojana

किती रक्कम मिळेल ???

यामध्ये दररोज 50 रुपये म्हणजेच दरमहा रुपये 1500 जमा करून 35 लाख रुपयांपर्यंतचा रिटर्न मिळू शकेल.

Post Office की इस शानदार स्कीम में हर महीने जमा करें 1500 रुपए, मिलेंगे 35 लाख, जानिए इसके फायदे| Zee Business Hindi

संपूर्ण रक्कम कधी मिळेल ???

यामध्ये गुंतवणूकदाराला 55 वर्षांच्या मुदतीच्या मॅच्युरिटीवर 31 लाख 60 हजार रुपये, 58 वर्षांच्या मॅच्युरिटीवर 33 लाख 40 हजार रुपये आणि 60 वर्षांत 34.60 लाख रुपये मिळतील. तसेच या योजनेंतर्गत, वयाची 80 वर्षे पूर्ण झाल्यावर ते सुपूर्द केले जाते. तसेच, जर व्यक्तीचे निधन झाले तर हे पैसे त्याच्या नॉमिनीला दिले जातील. Gram Suraksha Yojana

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indiapost.gov.in/Financial/Pages/Content/rpli.aspx

हे पण वाचा :
Cafe Coffee Day वर सेबी कडून मोठी कारवाई, ठोठावला 26 कोटींचा दंड
Bank FD : ‘या’ स्मॉल फायनान्स बँकेने एफडीचे दर वाढवले, ज्येष्ठ नागरिकांना 8.50% व्याज मिळवण्याची संधी
LIC च्या योजनेमध्ये गुंतवणूक दरमहा मिळवा 1000 रुपयांची पेन्शन !!!
Pension Scheme : केंद्र सरकार देत आहे दरमहा 20,000 रुपयांची पेन्शन, कसे ते जाणून घ्या
Jio कडून कमी किंमतीत भरपूर डेटा देणारे 2 रिचार्ज प्लॅन लॉन्च, जाणून घ्या या प्लॅनचे अतिरिक्त फायदे