नवी दिल्ली । दिवाळीत (Diwali) खासगी क्षेत्राच्या आयसीआयसीआय बँकने (ICICI Bank) आपल्या शेजारच्या दुकानदाराचा व्यवसाय (Business) झपाट्याने वाढवण्यासाठी एक चांगला पुढाकार घेतला आहे. यासाठी बँकेने डिजिटल स्टोअर मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म (DSMP) सुरू केले आहे. याद्वारे, दुकानदार पीओएस (PoS), क्यूआरकोड (QRCode) किंवा पेमेंट लिंकद्वारे (Payment Links) बिलिंगपासून पेमेंट पर्यंत सर्व काही मॅनेज करू शकतात. इतकेच नाही तर दुकानदार आपल्या किराणा दुकान (Grocery Shop) खूप वेगाने ऑनलाइन स्टोअरमध्ये (Online Store) रूपांतरित करू शकतो. यानंतर, त्याला ग्राहकांकडून ऑनलाईन ऑर्डर मिळणेही सुरू होईल.
कोणताही दुकानदार सहजपणे अॅपसाठी अर्ज करू शकतो
बँकेच्या म्हणण्यानुसार, कोणताही दुकानदार आपल्या इझीपे अॅपद्वारे पॉस मशीनसाठी अर्ज करतांना डिजिटल स्टोअर मॅनेजमेंट प्लॅटफॉर्मसाठी अर्ज करू शकतो. डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये तीन अॅप्लीकेशन आहेत. यापैकी, ईझीस्टोर मोबाइल अॅप (EazyStore mobile app) दुकानदारांना 30 मिनिटांत त्यांचे दुकान ऑनलाइन स्टोअरमध्ये रूपांतरित करण्यास अनुमती देते. त्याचबरोबर, यूपीआयद्वारे किंवा डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे पेमेंटची नोंद ईझीबिलिंग अॅपद्वारे (EazyBilling app) ठेवते. दुकानदार या अॅपद्वारे इंवेंट्री आणि ऑर्डर देखील मॅनेज करू शकतात.
दुकानदार इझीसप्लाय अॅपद्वारे डिस्ट्रीब्यूटर्सना ऑर्डर पाठविण्यास सक्षम असतील
या इझीसप्लाय अॅपमध्ये सेल्स, प्रॉफिट, जीएसटी व्यतिरिक्त अनेक प्रकारचे रिपोर्ट तयार करण्याचा पर्यायही उपलब्ध असेल. तिसर्या इझीसप्लाय अॅपद्वारे (EazySupply app) दुकानदार आपल्या होलसेल विक्रेत्यांना किंवा डिस्ट्रीब्यूटर्सना ऑनलाइन ऑर्डर पाठवू शकतात. यामुळे दुकानदाराचा वेळ वाचणार आहे. याव्यतिरिक्त, लहान दुकानदार देखील सप्लायर म्हणून उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या जाहिराती आणि सवलतीच्या योजना (Discount Schemes) सहजपणे उपलब्ध करुन देण्यास सक्षम असतील. बँकेच्या सेल्फ-एम्प्लॉयड सेगमेंटचे प्रमुख पंकज गाडगीळ म्हणाले की, “आता नवीन ग्राहकांना दुकानदारांपर्यंत पोहोचणे सोपे होईल.”
1 कोटी किराणा दुकानांना ऑनलाइन स्टोअरमध्ये रुपांतर करणार बँक
पंकज गाडगीळ म्हणाले की, कोरोना विषाणूच्या संकटाच्या काळात ग्राहक रोजच्या गरजा विकत घेण्यासाठी कॉन्टॅक्टलेस, सुलभ आणि डिजिटल उपायांना प्राधान्य देत आहेत. अशा परिस्थितीत अशा प्लॅटफॉर्मची खूप आवश्यकता जाणवली. आमच्या या नवीन प्लॅटफॉर्मच्या मदतीने, दुकानदार फार प्रयत्न न करता त्यांच्या किराणा दुकानाचे आधुनिक स्टोअरमध्ये रूपांतरित करू शकतील. या नवीन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बँकेने 1 कोटी किराणा दुकानांचे ऑनलाइन स्टोअरमध्ये रूपांतर करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.