लग्नात डान्स करताना नवरदेवाची स्टेप चुकली आणि थेट वधूच्या तोंडावरच लाथ बसली

Viral Video
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सोशल मीडियावर कपलचे अनेक व्हिडिओ (Viral Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हिडिओ मजेशीर तर काही व्हिडिओ (Viral Video) रोमँटिक असतात. सध्या असाच एक व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.

काय आहे या व्हिडिओमध्ये ?
या व्हिडिओमध्ये (Viral Video) दिसतंय की वधू खुर्चीवर बसलेली आहे आणि नवरदेव तिच्यासमोर डान्स करत आहे. दोघेही आपापल्या वेडिंग ड्रेसमध्ये कमालीचे सुंदर दिसत आहेत. पण त्यांचा लग्नाचा हा डान्स व्हायरल होऊन (Viral Video) लोकांमध्ये इतका लोकप्रिय होईल, याची कल्पनाही त्यांनी केली नसेल. मुलगी खुर्चीवर बसलेली असते आणि मुलगा समोर उभा असतो. नंतर दोघेही नाचू लागतात.

एका डान्स स्टेपनुसार मुलाला पाय उचलून मुलीच्या डोक्यावर न्यायला सांगितलं जातं; पण ही स्टेप फसते आणि उपस्थितांमध्ये हशा पिकतो. कारण वराने तिच्या डोक्यावरून पाय न्यायला पाय वर उचलला; पण तो जास्त उंचावरून नेता न आल्याने त्याचा पाय वधूच्या तोंडावर जोरदार आदळला आणि वधूचं डोकं खाली आपटलं. या कपलचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओ अनेक लोकांनी मजेशीर कमेंटसुद्धा केल्या आहेत. या व्हिडिओला सोशल मीडियावर आतापर्यंत चार लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे.

हे पण वाचा :
राजकीय भूकंप : शिवसेनेचे आ. शंभूराज देसाई नाॅटरिचेबल

कर्नाटकात सोने चोरी करणाऱ्या मध्य प्रदेशातील टोळीला धुळे पोलिसांकडून अटक

ठाकरे सरकार अडचणीत?? एकनाथ शिंदे गुजरातमध्ये

राजकीय भूकंप : कोरेगावचे आ. महेश शिंदे गुजरातमध्ये?

Commonwealth Games साठी पुरूष हॉकी टीम जाहीर; मनप्रीत सिंहकडे देण्यात आले कर्णधारपद