राजू शेट्टी भ्रमिष्ठ आणि भंपक माणूस; गावात जसा सोडलेला वळू असतो तसा – सदाभाऊ खोत

0
34
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

राजू शेट्टी भ्रमिष्ठ आणि भंपक माणूस असून, गावात जसा सोडलेला वळू असतो तसा, राजू शेट्टी हा वळू रेडा आहे, अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. सांगली जिल्ह्यातील झरे येथे सदाभाऊ हे बोलत होते.

राजू शेट्टी यांची मस्ती हातकणंगले मतदारसंघातील लोकांनी उतरवली आहे. बारामतीला राजू शेट्टी हे पाय चाटायला गेले होते. माझ्या वर टीका करण्या ऐवजी भीक मागून आमदारकी मागून घ्या. जिथं जाईल तिथं पाठवत खंजीर घुसपसयचा असा शेट्टीचा उद्योग आहे. अशी टीका ही माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

राजू शेट्टी यांच्या शाळेचा मी मुख्याध्यापक होतो, त्यामुळे त्याचा सर्व कारनामे माहीत आहेत, आमचं दूध दर वाढ आंदोलन यशस्वी झालं मात्र अनेक ठिकाणी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला. मुख्यमंत्री तुम्ही चूकीच्या लोकांच्या पंगतीला जाऊन बसला आहात, अशी टीकाही माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here