GST Council ची आज एक महत्त्वपूर्ण बैठक, कोरोना लस आणि ब्लॅक फंगसच्या औषधावरील कर निश्चित केला जाणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जीएसटी परिषदेची 44 वी महत्त्वाची बैठक आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली होते आहे. कोरोना कालावधीत या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांवर शिक्कामोर्तब होणे अपेक्षित आहे. अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये कोविडशी संबंधित जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

मागील बैठकीत ‘हे’ महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले
28 मे रोजी झालेल्या शेवटच्या बैठकीत पीपीई किट, मास्क आणि लसींचा समावेश असलेल्या कोविडशी संबंधित जीवनावश्यक वस्तूंवर कर सवलत देण्यासाठी मंत्र्यांचा एक गट (Group of Ministers) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, सात जून रोजी जीओएम ने आपला अहवाल सादर केला आहे.

कोरोना लस, ब्लॅक फंगसच्या औषधावरील कर निश्चित केला जाऊ शकतो
असे मानले जाते की, काही राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी कोविडशी संबंधित अत्यावश्यक वस्तूंवर दर कपातीची विनंती केली आहे. उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री सुरेशकुमार खन्ना म्हणाले की, राज्य सरकार रुग्णांच्या सोयीसाठी कोविडशी संबंधित जीवनावश्यक वस्तूंवर कर कमी करण्याच्या बाजूने आहे. तथापि, वस्तू व सेवा कर (GST) दराबाबत जीएसटी परिषदेचा निर्णय ते मान्य करतील.

कोरोनाशी संबंधित मदत सामग्रीमध्ये मेडिकल ऑक्सिजन, ऑक्सिजन काँसंट्रेटर, ऑक्सिजन सिलेंडर, ब्लॅक फंगस मास्क आणि औषध इत्यादींचा समावेश आहे, ज्यावर आज निर्णय घेतला जाऊ शकेल.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group