फुटवेअर अन् टेक्सटाइलवर 1 जानेवारीपासून GST वाढणार नाही ! आपल्याला कसा फायदा होईल जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । 1 जानेवारी 2022 पासून Footwear, Manmade Fiber आणि Fabrics वर जास्त GST आकारला जाणार आहे. मात्र आता एक बातमी येत आहे की, या सर्व गोष्टींवरील GST वाढवण्याचा निर्णय पुढे ढकलला जाऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक राज्ये यामुळे नाराज आहेत. नाराज राज्यांनी उद्या होणाऱ्या GST बैठकीत हा मुद्दा जोरात मांडण्याची तयारी केल्याचे समजते.

मनीकंट्रोलच्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, Footwear, Fabrics वरील GST वाढवण्याचा निर्णय पुढे ढकलला जाऊ शकतो. CNBC-Awaaz चे आलोक प्रियदर्शी यांनी सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की,”GST वाढवण्याचा निर्णय पुढे ढकलला जाऊ शकतो.”

GST आत्तापर्यंत असे दिसते
1 जानेवारीपासून दोन्ही क्षेत्रांवर 12% GST लागू होणार आहे. तर सध्या 1000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या Footwear, Fabrics वर 5% GST आकारला जातो. त्यामुळे GST कौन्सिलच्या बैठकीत या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता असल्याचे मानले जात आहे.

आलोक पुढे म्हणाले की,”सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आदी राज्य केंद्र सरकारच्या या निर्णयावर नाराज असून ही सर्व राज्ये निर्णय मागे घेण्याची मागणी करू शकतात, असे मानले जात आहे.” सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या राज्यांचे म्हणणे आहे की 85% उद्योगांवर या निर्णयाचा विपरीत परिणाम होणार आहे. सध्या, मानवनिर्मित फायबरवर 18%, मानवनिर्मित धाग्यावर 12% दराने GST आकारला जाऊ शकतो.

याचा सर्वसामान्य ग्राहकाला काय फायदा होणार आहे
याशिवाय मॅनमेड फॅब्रिक, 1000 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या फुटवेअर्सवर 5% GST आकारला जातो. इंडस्ट्रीत वापरल्या जाणार्‍या काही केमिकल्सवरही 18% GST आकारला जातो. त्याच वेळी, फायनल प्रोडक्टवरील कमी GST मुळे इंडस्ट्री रिफंड अडकतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे, या सर्व वस्तूंवर GST चे दर न वाढवण्याचा थेट फायदा सामान्य ग्राहकांना मिळेल. GST चे दर वाढवले ​​तर ग्राहकांना या गोष्टींसाठी आणखी खिसा मोकळा करावा लागेल.

Leave a Comment