वर्गशिक्षिकेने आपल्याच विद्यार्थ्यासोबत काढला घरातून पळ; पोलिसांत तक्रार दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । गुजरातच्या गांधीनगरमध्ये एक अजब घटना उघडकीस आली आहे. एका शाळेत शिकविणारीच वर्गशिक्षिका आपल्या विद्यार्थ्यासोबत पळून गेल्याची तक्रार मुलाच्या पालकांनी पोलिसांत दाखल केली आहे. गांधीनगर जिल्ह्यातील कालोल पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली आहे. मुलाचे वडिल सरकारी नोकरीत असून त्यांनी शिक्षिकेवर फूस लावून मुलाला पळल्याचा आरोप केला आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजल्यापासून शिक्षिका आणि मुलगा बेपत्ता आहे.

कालोल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षिका आणि मुलामध्ये वर्षभरापासून घनिष्ठ संबंध निर्माण झाले होते. या गोष्टी शाळा प्रशासनाच्या लक्षात आल्याने त्यांनी दोघांना समज दिली होती. मुलगा आठव्या इयत्तेत आहे. त्यांचे नाते कोणीही मान्य करणार नाही हे स्पष्ट होते. त्यामुळे शुक्रवारी दोघेही घर सोडून निघून गेले अशी माहिती पोलिसांनी दिली. दोघांनीही आपले मोबाइल सोबत नेलेले नाहीत. त्यामुळे त्यांचा शोध लागू शकलेला नाही असे कालोल पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी कलम ३६३ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा – 

लज्जास्पद! नांदेडमध्ये शिक्षकांनीच केला सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार