हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे साताऱ्यानंतर आता बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या या विधानावर आता शिवसेनेचे नेते तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना वाटत असेल राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा तर आम्हालाही वाटते कि उद्धव ठाकरे यांनी देशाचा पंतप्रधान व्हावे, असे म्हणत पाटील यांनी टोला लगावला आहे.
जळगाव येथील एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे शेतकऱ्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थिती लावली यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, प्रत्येकाला आपला पक्ष मोठा व्हावे असे वाटते, त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना ही त्यांचा पक्ष मोठा व्हावा, असे वाटत असेल यात चुकीचे नाही. आम्हाला वाटते कि आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान व्हावेत.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तुळजाभवानीला पक्षाचा मुख्यमंत्री व्हावे, असे साकडे घातले होते. त्यांच्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनीही दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाबाबत विधान केले. त्याच्या या विधानावर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.