गुणरत्न सदावर्ते आरोपी की VIP? : साताऱ्यात पोलिसांकडून पत्रकारांनाही प्रवेश नाकारला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा येथे एका दीड वर्षापूर्वीच्या गुन्ह्यात गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी काल ताब्यात घेतले आहे. कालपासून सदावर्ते यांच्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, एक आरोपी म्हणून गुणरत्न सदावर्ते यांना आणले आहे, की व्हीआयपी म्हणून असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे.

सातारा पोलिसांनी एका आरोपीला 250 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त न्यायालय परिसरात ठेवलेला आहे. गुणरत्न सदावर्ते यांना ज्या मार्गावरून नेण्यात येत आहे, त्या मार्गावर चोख बंदोबस्त ठेवलेला पहायला मिळाला. न्यायालयात गुणरत्न सदावर्ते यांच्या खटल्याच्या सुनावणीवेळी इतर कोणालाही प्रवेश दिला जात नाही. न्यायालयाचा मुख्य दरवाजा बंद करण्यात आला असून ये- जा करण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे.

गुणरत्न सदावर्ते हे केवळ भारत माता की जय ही एकच घोषणा कालपासून देत आहेत. आजही सातारा पोलिस ठाण्यातून नेताता आणि न्यायालयात आणल्यानंतरही हीच घोषणा दिली. मात्र, एका व्हीआयपी प्रमाणे सदावर्ते यांना सुरक्षा पोलिसांनी पुरविल्याचे दिसून येत आहे. यावेळी पत्रकारांनाही पोलिसांनी प्रवेश नाकारला आहे. यावेळी सुरक्षेच्या कारणावरून पत्रकारांना प्रवेश नाकारल्याचे पोलिस उपअधीक्षक आंचल दलाल यांनी सांगितले.