गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी संपकऱ्यांकडून 1.80 कोटी रुपये गोळा केले

Gunaratne Sadavarte
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ५३० असे तब्बल दीड कोटींहून अधिक रक्कम गोळा केल्याचा धक्कादायक दावा सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टात केला आहे. या पैशांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही सरकारी वकिलांनी केली. सदावर्ते यांच्यावर गिरगाव कोर्टात सुनावणी साठी आणले असता सरकारी वकिलांनी जोरदार युक्तिवाद करत सदावर्ते यांच्या अडचणी वाढवल्या आहेत.

गुनरत्न सादवारते यांनी ५३० रुपये प्रत्येक एसटी कर्मचा-यांकडून गोळा केले गेले. जवळपास दीड कोटी रुपये रक्कम जमा आहे. पवारांच्या घरावर ज्या दिवशी हल्ला झाला त्यादिवशी सकाळी 11.35 वाजता त्यांना नागपूरमधून व्हाॅटस अप कॉल झाले होते. नागपूर कॉल नंतर ‘पत्रकार पाठवा’ चा मेसेज करण्यात आले. दुपारी 2.42 काही पत्रकारांनाही कॉल करण्यात आले. हा सुनियोजित कट होता. आरोपींची समोरासमोर चौकशी करायची आहे. त्यामुळे वाढीव कोठडीची आवश्यकता आहे असा जोरदार युक्तिवाद वकील प्रदीप घरत यांनी केला

शरद पवार यांच्या घरावरील हल्ला हा पूर्वनियोजित कट होता.६ एप्रिल रोजीच या हल्ल्याचा कट ठरला होता. हे सगळं षडयंत्र अॅड गुणरत्न सदावर्तेंनी रचलं. १२ एप्रिलला बारामतीत आंदोलन करायचं, हे सदावर्ते भ्रम करण्यासाठी सातत्याने सांगत होते. पण सगळं नियोजन गुणरत्न सदावर्तेंनी केलं. त्यानुसार ठरल्याप्रमाणे पवारांच्या घरावर एसटी कामगार चालून गेले. पवारांच्या घरावर हल्ला झाला तेव्हा सदावर्तेंना नागपूरमधून फोन येत होते, असा दावा सरकारी वकिलांनी न्यायालयात केला