गुणरत्न सदावर्तेंची सुटका; 18 दिवसानंतर जामीन मंजूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर एसटी कामगारांनी हल्ला केल्या प्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. अटक केल्यानंतर त्यांना आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले होते. दरम्यान सदावर्ते यांची 18 दिवसांनी सुटका करण्यात आली आहे.

एसटी कामगारांनी पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला केल्यानंतर सदावर्ते आणि एसटी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सदावर्ते यांच्यावर राज्यभरात सातारा, कोल्हापूर, बीड, अकोला, सोलापूर येथे गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, पुणे पोलीस सदावर्ते यांना अटक करणार होते. मात्र, न्यायालयाने त्यांना अटकेतून दिलासा दिला. न्यायालयाने सदावर्ते यांना 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

अटकेच्या कालावधीत सदावर्ते यांना आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले होते. त्या ठिकाणी ते उपोषणाला बसले होते. दरम्यान आज न्यायालयाने सदावर्तेंना जामीन मंजूर केला. जेलमधून सुटका होताच सदावर्ते यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. तसेच आपण भ्रष्टाचाराविरोधात लढा देणार, असेही त्यांनी म्हंटले.

Leave a Comment