“पब्लिक है सब जानती है…”; न्यायालयाच्या निर्णयानंतर सदावर्तेची पहिली प्रतिक्रिया

Gunaratna Sadavarte
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

आज वकील गुणरत्न सदावर्ते यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी त्यांना सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. यावेळी जिल्हा सत्र न्यायालयाने सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालीयन काेठडी सुनावली. न्यालयाच्या निर्णयानंतर सदावर्ते यांनी “पब्लिक है सब जानती है…, न्यायालयावर माझा विश्वास आहे. न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे, अशी पहिली प्रतिक्रिया दिली.

सातारा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबत आज जिल्हा सत्र न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला. सदावर्ते यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयाच्या निर्णयानंतर न्यालयाच्या बाहेर येताच सदावर्ते यांनी “पब्लिक है सब जानती है…न्यायालयावर माझा विश्वास आहे. न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. असे म्हणत जय श्रीराम… भारत माता की जय…वंदे मातरम आणि जय-भीम,” अशी घोषणाबाजी केली.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/664796248147686

दरम्यान, आज न्यायालयाकडून सदावर्ते यांना पोलीस कोठडी सुनावली जाणार कि न्यायालयीन कोठडी? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने सदावर्ते यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर सायंकाळी साडे सहा वाजता सातारा पोलिस सदावर्ते यांना घेऊन ऑर्थर रोडकडे रवाना झाले.