हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । H3N2 : दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाने जगभरात हाहाकार उडवून दिला होता. त्यावेळी जवळपास प्रत्येक देशामध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. यामुळे जगभरात मंदीचे वातावरण आले. आता कुठे आपला देश त्यामधून सावरत होता तरच आणखी एका जीवघेण्या विषाणूने देशभरात खळबळ माजवली आहे. सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये इन्फ्लूएंझाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आता देशात H3N2 या विषाणूमुळे पहिला मृत्यू झाला आहे. यामुळे कर्नाटक आणि हरियाणा राज्यांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोन राज्यांव्यतिरिक्त इतर राज्यांमध्येही एकूण 4 मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याबरोबरच अनेक राज्यांमध्ये रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच आहे.
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात फ्लूचे रुग्ण वाढत आहेत. यातील बहुतेक संक्रमण हे एच3एन2 विषाणूमुळे झाले होते. या फ्लूला ‘हाँगकाँग फ्लू’ असेही म्हंटले जाते. मात्र, आतापर्यंत भारतात फक्त H1N1 आणि H3N2 चेच रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये थंडी वाजून येणे, ताप, धाप लागणे,खोकला आणि घरघर होणे यांसारखी लक्षणे दिसून येतात. तसेच संक्रमित व्यक्तीशी संपर्कानंतर त्याचा प्रसार होत असल्याचे निदर्शनात आले आहे.
वेगाने पसरतोय H3N2
विषाणूजन्य आजारांवर लक्ष ठेवणाऱ्या ICMR च्या शास्त्रज्ञांनी याबाबत माहिती देताना सांगितले की,” गेल्या दोन-तीन महिन्यांपासून H3N2 इन्फ्लूएंझा, मोठ्या प्रमाणावर पसरतो आहे.” याबाबत तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गेल्या 6 महिन्यांत इन्फ्लूएंझाच्या रुग्णांमध्ये 200 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याची तीन प्रमुख कारणे आहेत. यामध्ये नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंतचा हिवाळा, वायू प्रदूषणात झालेली वाढ आणि विषाणूजन्य संसर्ग यांचा समावेश आहे.
लक्षणे कोरोनासारखीच
हे जाणून घ्या कि, संपूर्ण देशभरात मिळून H3N2 विषाणूचे एकूण 90 रुग्ण झाले आहेत. तसेच H1N1 ची आतापर्यंत 8 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. कोविड हा श्वसनमार्गाच्या खालच्या भागावर परिणाम करतो. मात्र H3N2 हा वरच्या श्वसनमार्गावर परिणाम करत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. जसे कि, ताप, खोकला, सर्दी, घसा, नाक आणि अश्रूंमध्ये जळजळ होणे. या दोहोंची लक्षणे देखील सारखीच आहेत. याशिवाय ते वेगाने पसरतात.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.cdc.gov/flu/swineflu/variant/h3n2v-cases.htm
हे पण वाचा :
तब्ब्ल 18 वर्षानंतर शेअर बाजारात दाखल होणार TATA Group च्या कंपनीचा IPO
Post Office च्या स्कीममध्ये मिळतोय बँकांमध्ये जास्त रिटर्न, अशा प्रकारे करा गुंतवणूक
PNB खातेधारकांसाठी महत्वाची बातमी! बँकेकडून चेक पेमेंटच्या नियमांत बदल
Multibagger Stocks : अवघ्या वर्षभरात ‘या’ 6 स्मॉल कॅप शेअर्सनी दिला दुप्पट रिटर्न
New Business Idea : उन्हाळ्यात प्रचंड मागणी असणाऱ्या ‘या’ व्यवसायाद्वारे दरमहा मिळवा हजारो रुपयांचे उत्पन्न