भंडाऱ्यात मानसिक रुग्न महिलेने मंदिरात हनुमानाचा चांदीचा डोळा चोरला, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

0
149
Theft
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडाऱ्यामध्ये मानसिक रुग्न महिलेने हनुमानाच्या मंदिरात चोरी (Theft) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या महिलेने हनुमानाचा चांदीचा डोळा चोरुन नेला आहे. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी शहरामध्ये हि चोरीची (Theft) घटना घडली आहे. चोरीची (Theft) ही संपूर्ण घटना मंदिरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पुष्पा असे या चोरी करणाऱ्या मनोरुग्ण महिलेचे नाव आहे. चोरीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. याप्रकरणी कोणत्याही पोलीस ठाण्यात अद्याप तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मोहाडी शहरातील बायपास रोडवर श्रीराम मंदिर आहे. या मंदिरात हनुमानाचीही मूर्ती आहे. सोमवारी सकाळी 7.55 वाजण्याच्या सुमारास पुष्पा नावाची महिला हनुमान मंदिरात आली. त्यावेळी या मंदिरात पुजारी किंवा भाविक कुणीही नव्हते. याच संधीचा फायदा घेत पुष्पा हनुमानाच्या मूर्तीचा चांदीचा डोळा काढून पसार झाली आहे.

यानंतर काही वेळाने जेव्हा या मंदिराचे पुजारी मंदिरात आले तेव्हा हनुमानाच्या मूर्तीवर चांदीचा डोळा नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका महिलेने हा डोळा चोरल्याचे (Theft) उघडकीस आले. या संपूर्ण चोरीचा (Theft) व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
भंडाऱ्यात बर्निंग ट्रकचा थरार, भयानक कारण आले समोर

रस्त्यावरील वळण न दिसल्याने मोटरसायकलचा अपघात; 3 ठार 1 जखमी

दुर्दैवी ! इंद्रायणी नदीत पाण्यात बुडून माय-लेकांचा मृत्यू

अनवाणी पायाने आगीवर धावताना दिसली मुले, धक्कादायक Video आला समोर

वाढत्या कोरोनामुळे शाळा बंद राहणार कि सुरु ?; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे मोठे विधान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here