हरी नरके विचारवंत कमी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते जास्त वाटतं आहेत ; देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | “जेष्ठ विचारवंत आणि ओबीसी आरक्षण अभ्यासक हरी नरके हे सध्या विचारवंत कमी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्तेचं जास्त वाटतं आहेत अशी घणाघाती टीका राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केली.

पुणे महापालिका सभागृह नेते हेमंत रासने यांच्या पुढाकाराने आजपासून पुण्यात १० रुपयात ए सी बसचा प्रवास ही योजना सुरू करण्यात आली आहे.या योजनेच्या लोकार्पण कार्यक्रम करून महापौरांच्या शासकीय निवासस्थानी फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले की “मी असेल किंवा भागवत कराड असतील आम्ही मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झालो आहोत म्हणून आम्ही याला मंत्री पद दिलं म्हणून त्याला संपवण्याचा प्रयत्न करू किंवा गटा – तटाच करूच शकत नाहीत.तसेच ओबीसी प्रश्नावर हे सरकार उघडे पडले असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली.एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसे यांची ईडी चौकशी प्रश्नावर त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.पण अजित पवार यांच्यावर सहा चार्ज शीट दाखल झाल्या आहेत त्यावर लवकरच कारवाई केली जाईल अशी टिपण्णी देखील त्यांनी केली. सोबतच मी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे पण राज्याचा विकास साधला गेला पाहिजे असेही ते म्हणाले.