हर्षवर्धन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश ; राष्ट्रवादीवर घेतले तोंडसुख

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या त्रासाला कंटाळून हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे कॉंग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी भाजप प्रवेशाच्या वेळी त्यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. त्याच प्रमाणे भाजप जी जबाबदारी देईल ती जबाबदारी मी पार पडेल असे हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा हसरा आहे आणि इथून पुढे अधिक हसरा राहणार आहे. कारण त्यांच्यासोबत आता हर्षवर्धन आहे असे देखील हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत. त्याच प्रमाणे मित्र आणि शत्रू बदलता येतात पण शेजारी बदलता येत नाहीत अशी नाव नघेता टीका सुद्धा त्यांनी राष्ट्रवादीवर केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत. त्याच प्रमाणे त्यांचा विजय देखील निश्चित होईल असे म्हणले आहे. आम्ही ज्यावेळी विरोधी बाकावर होतो तेव्हा हर्षवर्धन पाटील संसदीय कामकाज मंत्री म्हणून काम करत होते. मुख्यमंत्र्यांवर आम्ही तुटून पडलो की हर्षवर्धन पाटील आमची समजूत काढत असत अशी जुनी आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली आहे.