हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भोंदूबाबांच्या मायाजाळात अनेक महिला अडकत आहेत. तर महिलांच्या अज्ञानाचा फायदा घेत भोंदूबाबांकडूनही अघोरी कृत्य केले जात आहेत. जलेबी बाईनंतर आता हरियाणातील अमरपुरी येथील जलेबी बाबाने 100 पेक्षा अधिक महिलांवर अत्याचार करुन त्यांचे व्हिडिओ बनवले आहेत. अशा या महिलांचे आयुष्य उद्धवस्त करणाऱ्या जलेबी बाबाला न्यायालयाने दोषी ठरवले आहे.
सध्या हरियाणाच्या जलेबी बाबाची चांगलीच चर्चा होत असून त्याने महिलांना तंत्र-मंत्राच्या जाळ्यात अडकवून त्यांच्यावर अत्याचार केला आहे. चार वर्षांपूर्वी हरियाणातील फतेहाबाद जिल्ह्यातील टोहाना येथून पोलिसांनी या जलेबी बाबाला अटक केली होती. या बाबाने एक नाही दोन नाही तर तब्बल 120 अल्पवयीन मुली आणि महिलांवर अत्याचार केला. हे कृत्य करण्यासाठी तो एक विशिष्ट अशी पद्धत वापरायच्या. तो त्याच्याकडे येणाऱ्या महिलांना तसेच मुलींना नशिली चहा द्यायचा. तो चहा पिल्यानंतर त्या बेशुद्ध होत असे. आणि त्यानंतर सुरु व्हायचा या बाबाचा अघोरी कार्यक्रम. त्यानांतर तो त्या महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवायचा आणि त्यांना ब्लॅकमेलही करायचा.
या बाबाच्या कृत्याबद्दल पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी बाबाच्या अड्यावर छापा टाकला. यावेळी पोलिसांना बाबाकडे 120 महिलांशी संबंध प्रस्थापित करतानाचे व्हिडिओ सापडले. त्यानंतर हरियाणातील फतेहाबादमध्ये आपल्या भोंदुगीरीने महिलांना गंडवणाऱ्या या 63 वर्षांच्या जलेबी बाबाला दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी 200 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी करताना न्यायालयाने अमरपुरी उर्फ जलेबी बाबा याला 5 जानेवारीला दोषी ठरवून 10 जानेवारी शिक्षेची तारीख निश्चित केली आहे.
जलेबी बाबा अमरपुरीत ‘बिल्लू’ नावाने प्रसिद्ध
महिलांवर अत्याचा करणाऱ्या या जलेबी बाबावर फतेहाबादच्या टोहाना शहर पोलिसांनी 2018 मध्ये गुन्हा दाखल केला करण्यात आला होता. हा बाबा अमरपुरीत बिल्लू या नावाने पर्सिथ होता. एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतेले होते. त्यानंतर वेगवेगळ्या पीडितांचे असे सुमारे 120 व्हिडिओ तपासादरम्यान समोर आले.
सहा मुलाचा बाप कसा झाला जलेबी बाबा?
महालावर अत्याचार करणारा जलेबी बाबा हा 23 वर्षांपूर्वी पंजाबच्या मानसा शहरातून तोहानाला आला होता. त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. चार मुली आणि दोन मुलांचा तो बाप आहे. सुरुवातीला तो 13 वर्षे त्यांनी जिलेबीचा स्टॉल चालवला. यादरम्यान त्यांची भेट एका तांत्रिकाशी झाली ज्याने त्यांना तांत्रिक साधनेची सुरुवात केली. यानंतर तो टोहना येथून काही वर्षे गायब झाला. यानंतर तो परत गावात आला आणि मंदिराशेजारी घर बांधले. नंतर त्याने भोंदुगिरीचा धंदा थाटला आणि बघता बघता तो जलेबी बाबा म्हणून प्रसिद्ध झाला.