जेव्हा काही घडलंच नाही, मग आपले २० जवान शहीद का झाले? चिदंबरम यांचा केंद्राला सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठकीनंतर भारतीय हद्दीत कोणत्याही प्रकारची घुसखोरी चीनकडून झालेली नाही असं वक्तव्य केलं होत. या वक्तव्यानंतर विरोधकांनी मोदी सरकावर अनेक प्रश्नाची सरबत्ती केली आहे. काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही मोदींच्या काही घडलंच नाही या भूमिकेवर परखड सवाल उपस्थितीत केले आहेत.

चिदंबरम म्हणाले कि, जर घुसखोरी झालीच नाही असं पंतप्रधान म्हणत आहेत तर मग भारताचे २० जवान शहीद कसे झाले? मग ५ आणि ६ मे रोजी जे झालं ते काय होतं? गेल्या काही दिवसांमध्ये भारत आणि चीन या दोन देशांच्या सैनिकांमध्ये संघर्ष कसा झाला? चकमकी कशा घडल्या ? १६ आणि १७ जूनला काय झालं? भारताचे २० जवान शहीद कसे झाले? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला क्लीन चिट दिली आहे का? असे प्रश्न पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारला विचारले आहेत.

सोमवारी रात्री लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. चिनी सैनिकांनी धोका देऊन केलेल्या हल्ल्यात ही घटना घडली. त्यानंतर शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत सुमारे २० पक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत शरद पवार, सोनिया गांधी, ममता बॅनर्जी यांच्यासारख्या दिग्गजांनी मोदींना काही सल्ले दिले, सूचनाही दिल्या. तसंच देश एकजूट रहावा यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत अशीही ग्वाही दिली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर केलेल्या भाषणात भारतात घुसखोरी झालेली नाही असं म्हटलं होतं. यावरुनच माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”