आपल्या Pan Card चा गैरवापर तर झाला नाही ना ??? घरबसल्या अशा प्रकारे तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Pan Card हे एक अत्यंत महत्त्वाच्या डॉक्युमेंट्स पैकी एक आहे. जे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटद्वारे जारी केले जातात. पॅन कार्डमध्ये 10 अंकी युनिक अल्फान्यूमेरिक नंबर असतात. हे लक्षात घ्या कि, पॅन कार्डचा वापर फक्त टॅक्स संबंधित कारणांसाठीच नाही तर ओळखीचा पुरावा म्हणूनही केला जातो. अगदी बँकेमध्ये खाते उघडण्यापासून ते अनेक महत्वाच्या आर्थिक व्यवहारांसाठी देखील ते आवश्यक असते. आता पॅन कार्डच्या गैरवापर झाल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. यामध्ये कोणत्याही व्यक्तीच्या आधार आणि पॅनकार्डद्वारे कर्ज घेतले जात आहेत. अशा परिस्थितीत जर आपल्या पॅनकार्डचा गैरवापर तर होत नाही ना हे जाणून घेणे महत्वाचे ठरेल.

What is Pan Card: Eligibility, How to Apply, Documents Required etc.

फसवणूक करणाऱ्या लोकांकडून आपल्या PAN Card चा वापर क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी, कर्ज घेण्यासाठी, चुकीच्या मार्गाने दागिने खरेदी करण्यासाठी करू शकताल. जर आपले पॅन कार्ड किंवा आधार कार्ड चुकीच्या व्यक्तीकडे गेले तर तो आपल्या नावावर कर्ज देखील घेऊ शकतो. अशा प्रकारची फसवणूक करण्यासाठी सर्वात आधी आपली वैयक्तिक माहिती चोरली जाते.

क्या PAN Card भी कभी एक्सपायर होता है? जानिए आपका सबसे महत्वपूर्ण डॉक्यूमेंट कब तक रहता है वैलिड | Zee Business Hindi

‘या’ कामांसाठी PAN Card द्यावे लागेल : –

>> बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी
>> शेअर मार्केटमधील ट्रेडिंगसाठी
>> इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी
>> कर्ज घेण्यासाठी
>> मालमत्तेची खरेदी करण्यासाठी
>> सोने खरेदी करण्यासाठी

Lost PAN card? Here's how to download e-PAN | Personal Finance News | Zee News

घरबसल्या अशा प्रकारे तपासा PAN Card ची ट्रान्सझॅक्शन हिस्ट्री-

>> ते तपासण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे क्रेडिट स्कोअर तपासणे.
>> आपल्याला ते Paytm, Bank Bazaar, TransUnion CIBIL, Equifax, Experian, CRIF High Mark इत्यादी वेबसाइटवरून तपासता येईल.
>> यासाठी सर्वात आधी संबंधित वेबसाइट उघडा. काही वेबसाईट्सकडून क्रेडिट स्कोअरसाठी पैसे आकारले जातात.
>> यासाठी जन्मतारीख, ईमेल आयडी, रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि पॅन कार्ड नंबर सारखी काही माहिती देखील द्यावी लागेल.
>> यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो टाका.
>> आता आपल्याला क्रेडिट स्कोअर पाहता येईल. यावरून आपल्या पॅनचा गैरवापर होतो की नाही हे कळेल.

जर आपल्या पॅन कार्डचा गैरवापर झाला असेल तर यासंदर्भात इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची अधिकृत वेबसाइट https://incometax.intelenetglobal.com/pan/pan.asp वर जाऊन तक्रार दाखल करता येईल.

हे पण वाचा :
बाजारात धुमाकूळ घालायला येतोय OnePlus चा ‘हा’ स्वस्त फोन, असे असतील फीचर्स
Charger : आपला फोन वारंवार चार्ज करण्याने त्याच्या बॅटरीवर काय परिणाम होईल ते जाणून घ्या
Digital Gold : आता फक्त 1 रुपयात खरेदी करता येईल सोने, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया
3 स्टार-5 स्टार AC मध्ये काय फरक आहे??? यापैकी कोणता खरेदी करणे फायदेशीर ठरेल ते पहा
Cardless Cash Withdrawal : आता डेबिट कार्ड नसतानाही ATM मधून काढता येतील पैसे, कसे ते जाणून घ्या