काँग्रेस शिष्टमंडळाच्या मागणीनंतर हसन मुश्रीफांनी दिले मागासवर्गीय शिक्षक भरतीचे निर्देश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागासवर्गीय शिक्षक भरती प्रश्नी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक भरती कृती समितीने आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. यावेळी मुश्रीफ यांनी शिक्षक भरती तात्काळ करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले.

शिक्षक भरतीसाठी डिसेंबर २०१७ मध्ये परीक्षा होऊन मार्च २०१८ मध्ये निकालही लागला त्यानंतर सहा महिन्यांनी शासनाच्या पवित्र पोर्टलवर नोंदणीही करण्यात आली परंतु मागील सरकारच्या काळात ग्रामविकास खात्याच्या शिफारसीवरून शिक्षण खात्याने एक जीआर काढून ८००० जागापैकी ४००० जागा रद्द केल्या. या जागा भराव्यात म्हणून वारंवार आंदोलने करण्यात आली तसेच मागील सरकारचे मंत्री, अधिकारी यांच्याशी चर्चाही झाल्या परंतु या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले.

शिक्षक भरती कृती समितीने ११ फेब्रुवारीपासून आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरु केले त्याची दखल घेत काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी आज या आंदोलकांसह ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन मागासवर्गीय शिक्षक भरतीच्या प्रलंबित प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली. यावेळी शिक्षक भरतीचे आदेश देत आंदोलन मागे घ्यावे असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment