हाथरस पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझादसह ५०० कार्यकर्त्यांवर गुन्हा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हाथरस । हाथरसमधील घटनेनंतर भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. हाथरसला जात असताना त्यांना रोखण्यात आले होते. दरम्यान, आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चंद्रशेखर आणि त्यांच्यासोबत असलेल्या ५०० कार्यकर्त्यांविरोधात सासनी पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला आहे.

भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद रविवारी पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात गेले. गावात जाण्यापूर्वी आझाद यांना अलीगढ आणि हाथरस दरम्यान रोखण्यात आले होते. मात्र, त्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्यांना पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्याची परवानगी दिली. आझाद हे पीडितेच्या गावात गेले आणि तिथे कुटुंबीयांची भेट घेतली.

चंद्रशेखर आझाद यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. पीडितेच्या कुटुंबीयांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात यावी अशी माझी मागणी आहे. त्यांना सुरक्षा दिली नाही तर मी त्यांना माझ्या घरी घेऊन जाईन. ते येथे सुरक्षित नाहीत. सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या निरीक्षणाखाली या घटनेची चौकशी व्हावी, अशी मागणी आझाद यांनी केली

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.