हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । HDFC Bank ने 2 महिन्यांच्या कालावधीनंतर फिक्स्ड डिपॉझिट्सच्या व्याजदरात वाढ केली आहे. बँके कडून एफडीचे दर 40 बेसिस पॉइंट्स (0.40 टक्के) पर्यंत वाढवले आहेत. 18 ऑगस्ट 2022 पासून हे नवीन व्याजदर लागू झाले आहेत. हे दर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या FD साठी लागू आहेत.
HDFC Bank च्या वेबसाइटवर दिलेल्या माहिती नुसार, एक वर्ष ते दोन वर्षांच्या कालावधीसाठी आता 5.35 टक्क्यांवरून 5.50 टक्के व्याजदर मिळेल. त्याचबरोबर 2 वर्षे ते 3 वर्षे ते एका दिवसापेक्षा कमी कालावधीसाठी 5.50 टक्के व्याजदर मिळेल. HDFC Bank कडून आता 3 वर्षे आणि एक दिवस ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी 6.10 टक्के व्याजदर मिळेल.
हे लक्षात घ्या कि, RBI कडून 8 ऑगस्ट 2022 रोजी रेपो दरांमध्ये 50 बेस पॉइंट्सची वाढ केली. RBI कडून मे 2022 नंतर तिसऱ्यांदा वाढ केली गेली. तेव्हापासून बँका एफडीवरील दर वाढवत आहेत. HDFC Bank
पीएनबी आणि कोटक बँकेनेही एफडीवरील व्याजदरात केली वाढ
काल PNB ने देखील एक वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या FD वर 0.20 टक्क्यांनी व्याजदर वाढवला आहे. आता PNB कडून त्यांच्यावर 5.50 टक्के व्याज देणार आहे. बँकेने 1 वर्षापेक्षा जास्त मात्र 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 0.15 टक्के व्याजदर वाढवले आहेत. आता ते 5.45 टक्क्यांवरून 5.50 टक्के करण्यात आले आहेत. HDFC Bank
कोटक महिंद्राने देखील एफडीवरील व्याजदरात 0.15 टक्क्यांनी वाढ केली आहे. बँकेने 365 ते 389 दिवसांच्या कालावधीसाठी व्याजदर 0.15 टक्क्यांनी 5.75 टक्क्यांनी वाढवले आहेत. 390 ते तीन वर्षांच्या FD वर आता 5.90 टक्के व्याज मिळेल. HDFC Bank
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.hdfcbank.com/personal/resources/rates
हे पण वाचा :
Gold Price Today : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त !!!
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
Bank FD : आता ‘या’ 2 बँकांनी आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात केली वाढ, नवे दर पहा
Mahindra Electric Cars : महिंद्राचा मोठा धमाका!! लवकरच लॉंच करणार 5 इलेक्ट्रिक SUV