HDFC Bank ने ग्राहकांना दिला मोठा धक्का, ग्राहकांच्या EMI मध्ये झाली वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । HDFC Bank : 8 फेब्रुवारी रोजी RBI ने आपल्या त्रेमासिक पतधोरण आढाव्यात पॉलिसी रेपो रेट 0.25 टक्क्यांनी वाढवला आहे. ज्यानंतर अनेक बँकांकडून आपल्या व्याजदरात वाढ करण्यात येऊ लागली आहे. यादरम्यान आता देशातील खासगी क्षेत्रातील HDFC Bank ने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का देत आपल्या कर्जदरात 0.25 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली. यानंतर आता या बँकेकडून कर्ज घेणे महागणार आहे. तसेच बँकेचे हे नवीन दर 1 मार्च 2023 पासून लागू होतील. एका निवेदनात HDFC Bank ने म्हटले की,” त्यांनी आपल्या मुख्य कर्ज दरात 0.25 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. यानंतर आता त्यांचा रिटेल प्राइम लोन रेट 9.20 टक्के झाला आहे.

HDFC Bank's assets to show minimal signs of Covid stress - The Economic Times

PNB ने देखील नुकतेच MCLR वर आधारित दर 0.10 टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली. ही वाढ सर्व मुदत कर्जांवर लागू होईल. PNB च्या अधिकृत वेबसाइट वरील माहितीनुसार, बँकेने ओव्हरनाईट MCLR 7.90% वरून 8.00% पर्यंत वाढवला आहे. तसेच आता एका महिन्याच्या कर्जासाठीचा MCLR 8.10%, 3 महिन्यांच्या कर्जासाठीचा MCLR 8.20% आणि 6 महिन्यांच्या कर्जासाठीचा MCLR 8.40%, एका वर्षाच्या कर्जासाठीचा MCLR 8.50% आणि तीन वर्षांसाठीच्या कर्जासाठीचा MCLR 8.80% निश्चित केला आहे. HDFC Bank

PNB Q1 results: Net profit slumps 70% YoY to Rs 308 cr - BusinessToday

जास्त EMI द्यावा लागणार

MCLR मध्ये वाढ झाल्याने आता टर्म लोन वरील EMI वाढण्याची अपेक्षा आहे. बहुतेक ग्राहक कर्जे ही एका वर्षाच्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेटवर आधारित असतात. अशा परिस्थितीत, MCLR वाढल्यामुळे पर्सनल, ऑटो आणि होम लोन महागतील.

RBI hiked repo rate by 50 bps to 5.40% to counter inflation |

रेपो दरात सलग सहाव्यांदा वाढ

8 फेब्रुवारी रोजी RBI सलग सहाव्यांदा रेपो दरात वाढ केली. पतधोरण बैठकीनंतर माहिती देताना गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, जगातील वाढत्या महागाईचा दबाव भारतावरही आहे आणि त्यावर पूर्णपणे मात करण्यासाठी पुन्हा एकदा कर्जाच्या व्याजदरात वाढ करणे आवश्यक झाले आहे. मात्र, यावेळी रेपो दरात केवळ 0.25 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.

MCLR काय असते ???

MCLR ही RBI ने विकसित केलेली एक पद्धत आहे ज्या आधारावर बँकांकडून कर्जाचा व्याजदर ठरवला जातो. या आधी सर्व बँका बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठीचे व्याजदर निश्चित करत असत.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.hdfcbank.com/personal/resources/learning-centre/borrow/what-is-the-difference-between-base-rate-and-mclr

हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर पहा
आता Yes Bank ची अनेक कामे Whatsapp वरच करता येणार, कसे ते समजून घ्या
Budget Cars : 10 लाखांच्या बजटमधील ‘या’ 5 उत्कृष्ट कार, फीचर्स अन् किंमत तपासा
आता Home Loan घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, घरबसल्या सहजपणे मिळवा पैसे
HDFC Bank ने ग्राहकांना दिला मोठा धक्का, ग्राहकांच्या EMI मध्ये झाली वाढ