HDFC Credit Card : HDFC बँकेने लाँच केली 4 नवी क्रेडिट कार्ड्स; जाणून घ्या कोणाला होणार फायदा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (HDFC Credit Card) देशातील खाजगी व्यावसायिक क्षेत्रात सर्वात मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या HDFC बँकेने नवीन ४ बिजनेस क्रेडिट कार्ड्स लॉंच केली आहेत. HDFC बँकेने छोट्या आणि मध्यम स्वरूपाच्या व्यावसायिकांसाठी अर्थात SME साठी ही क्रेडिट कार्ड्स लॉंच केली आहेत. त्यामुळे या बिजनेस क्रेडिट कार्डसाठी केवळ SME क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक अर्ज करू शकणार आहेत.

HDFC बँकेने दिलेल्या माहितीनुसार, SME साठी लॉंच करण्यात आलेल्या क्रेडिट कार्ड्सची नावे पुढीलप्रमाणे BizFirst, BizGrow, BizPower आणि BizBlack अशी आहेत. ही ४ क्रेडिट कार्ड सादर केल्याची माहिती HDFC बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. (HDFC Credit Card) छोटे आणि मध्यम स्वरूपाचे व्यापार असलेल्या प्रत्येक व्यावसायिकासाठी हे क्रेडिट कार्ड फायदेशीर ठरणार आहेत. HDFC बँकेने छोट्या व्यावसायिकांच्या गरजा लक्षात घेऊन ही चार क्रेडिट कार्ड्स सादर केली आहेत. या क्रेडिट कार्ड्सचा छोट्या व्यावसायिकांना कसा आणि काय फायदा होईल? याविषयी जाणून घेऊया.

HDFC च्या नव्या क्रेडिट कार्ड्सचे व्यावसायिकांना होणार ‘हे’ फायदे (HDFC Credit Card)

1. मर्यादित कालावधीसाठी बिनव्याजी कर्ज

HDFC बँकेने लाँच केलेल्या या क्रेडिट कार्ड्सची काही खास वैशिट्ये आहेत. त्यांपैकी एक म्हणजे तुम्हाला या क्रेडिट्स कार्डमुळे मर्यादित बिनव्याजी कर्ज कालावधी मिळेल. हा व्याजमुक्त कालावधी ५५ दिवसांचा असेल. ज्याच्या मदतीने छोटे आणि मध्यम व्यवसाय करणारे लोक सहजपणे स्थिरता निर्माण करू शकतील. तसेच या क्रेडिट कार्ड्सवर EMI आणि कर्जाची सुविधादेखील उपलब्ध आहे. त्यामुळे हा आणखी एक फायदा म्हणायला हरकत नाही.

2. व्यावसायिक खर्चात होणार बचत

या क्रेडिट कार्डचा महत्वाचा फायदा असा कि, व्यावसायिकांच्या व्यवसायाशी संबंधित अनेक खर्चांमध्ये बचत होणार आहे. उदाहरण देऊन सांगायचं झालं तर, GST, Income Tax, विक्रेत्यांना पेमेंट करणे, व्यवसायासाठी करावयाचा प्रवास. बँकेने सांगितल्याप्रमाणे, जर एखाद्या व्यापाऱ्याने या क्रेडिट कार्ड्सचा वापर करून खर्च केला तर त्याला 10X रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील. अशाप्रकारे स्मॉल स्केल बिजनेससाठी लागणारे खर्च करूनही मोठी बचत करण्याची संधी मिळेल. (HDFC Credit Card) शिवाय हॉटेल, मायक्रोसॉफ्ट 365, क्लियर टॅक्स, ॲमेझॉन बिझनेस आणि गुगल ॲड्ससारखे रिडेम्पशन पर्याय आणि बिजनेस पॉलिसी पॅकेज अंतर्गत आग, चोरी, रोख सुरक्षितता उपलब्ध आहे.

आणखी एक महत्वाची माहिती द्यायची म्हणजे बँकेकडून सांगण्यात आले आहे की, लवकरच Giga Business Credit Card देखील लाँच करण्यात येणार आहे. फ्रीलांसर आणि गिग इकॉनॉमीमध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे बँकेकडून सांगण्यात आले आहे. (HDFC Credit Card)