Wednesday, October 5, 2022

Buy now

राज्यसभा निवडणुकीतील सहा जागांच्या मतमोजणीस थोड्या वेळातच सुरुवात; कोण विजयी होणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण या निवडणुकीसाठी 285 आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीनंतर आता प्रत्यक्ष निकालाकडे लक्ष लागले आहे. दरम्यान पाच वाजता निवडणूक अधिकाऱ्यांनी मतमोजणी सुरु करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगास मेल केला. त्यानंतर केंद्रीय निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याला परवानगी दिल्यानंतर मतमोजणीला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. मात्र, काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत. त्यात भाजपचे पियुष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक यांनी अर्ज भरले आहेत. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार मैदानात आहेत. निवडणुकीत विजयी होण्यासाठी उमेदवाराला 43 मतांची आवश्यकता लागणार आहे.

राज्यात राजकीय पक्षांमध्ये कमालीची चुरस निर्माण झाली होती. घोडेबाजाराच्या आरोपामुळे गाजलेल्या या निवडणुकीत भाजपा, शिवसेना की काँग्रेसचा उमेदवार कोणता उमेदवार जिकणार आणि राज्यसभेत कुणाचा गुलाल उडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.