बाप-लेकीला मारहाण करत चक्क 25 शेळ्यांवर मारला डल्ला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड | धारूर तालुक्यातील कुरणवाडी येथे बापलेकीचे हाथपाय बांधून यांना मारहाण करत चक्क 25 शेळ्या पळविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

या घटनेची माहिती मिळताच धारूर पोलिसांनी पहाटे घटनास्थळी पाहणी करून जखमी बाप लेकीला धारूर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सदर घटनेची माहिती शेतकऱ्यांनी पोलिसांना दिली होती. अर्जुन डोंगरे (वय 80) आणि त्यांची मुलगी कौशल्या अभिमान भालेराव (वय48) असे या बापलेकीचे नाव आहे. हे दोघे गावाच्या जवळ राहतात. त्यांच्याकडे लहान-मोठ्या अशा एकूण 25 शेळ्या होत्या.

मध्यरात्री अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान चार चोरांनी येऊन बाप लेकीला मारहाण केली आणि त्यांचे हातपाय बांधून त्यांच्या सर्व शेळ्या एका वाहनात टाकून पसार झाले. या घटनेनंतर शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने पोलिसांशी संपर्क साधला. नंतर धारूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या जखमी बाप-लेकीला रुग्णालयात दाखल केले. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.