कोरोनावरून केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी राज्य सरकारला फटकारले, म्हणाले ‘तुम्ही लोकांचा जीव धोक्यात घालताय…’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती रुग्ण संख्या पाहता केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र सरकारला चांगलंच झापले आहे. राज्य केंद्राकडे मदत मागत आहे पण महाराष्ट्रातील सरकार हे संपूर्ण लोकांचे जीव धोक्यात घालत आहे. केवळ वैयक्तिक वसुलीसाठी संस्थात्मक विलगीकरण याचे नियम कठोरपणे अमलात येत नाहीत असं म्हणत केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी जोरदार टीका केली आहे. एका पत्राद्वारे केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या पत्राद्वारे त्यांनी महाविकास आघाडी सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

यावेळी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी म्हटले आहे की ‘आम्ही राज्य सरकारला सातत्याने मदत केली त्यांना सर्व संसाधन उपलब्ध करून दिली केंद्रीय चमू पाठवला पण राज्‍य सरकारच्‍या प्रयत्‍नांनी काय झाले? याचा परिणाम आज आपल्यासमोर आहेत. आज महाराष्ट्रात केवळ सर्वाधिक रुग्ण आणि सर्वाधिक मृत्यू नाही तर जगातील सर्वाधिक संसर्ग दरसुद्धा महाराष्ट्रात आहे. टेस्टिंग मध्ये अजूनही सुधार व्हायला तयार नाही आणि रुग्णांचे संपर्क शोधण्यात सुद्धा कमतरता आहेत. अशी टीका आरोग्य मंत्र्यांनी केली आहे.

कोरोना प्रादुर्भाव होऊन एक वर्ष उलटले तरी अनेक राज्यांना करोना आटोक्यात आणण्याचा व्यवस्थापन जमलं नाही. आज अनेक राज्य 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना लसीकरणाची मागणी करत आहेत. परंतु मागणी-पुरवठा यांचा निकष सर्व राज्य सरकारांशी दरवेळी पारदर्शकपणे चर्चा केल्यानंतर लसीकरणाचे धोरण निश्चित करण्यात आले आहेत. असं हर्षवर्धन यांनी नमूद केले आहे.

राज्य सरकारने काय केलं?

आता जो प्राधान्यक्रम ठरवून देण्यात आला आहे त्यात सरकार ने काय केलं असा सवाल हर्षवर्धन यांनी उपस्थित केलाय. महाराष्ट्र आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी 86 टक्के लोकांना डोस दिले तर दुसरीकडं दहा राज्य अशी आहेत ज्यांनी हे उद्दिष्ट 90 टक्‍क्‍यांहून अधिक गाठले आहे. महाराष्ट्राने आरोग्य कर्मचाऱ्यांना पैकी केवळ 41 टक्के लोकांना डोस दिला आहे. तर दुसरीकडं बारा राज्य, केंद्रशासित प्रदेश यांनी हे उद्दिष्ट 60 टक्क्यांहून अधिक गाठले आहे.

फ्रंटलाईन वर्कर त्या वर्गातील पहिला डोस देण्यात महाराष्ट्रने 73 टक्के लोकांचा लसीकरण केलं तर पाच राज्यांमध्ये हे प्रमाण 85 टक्क्यांहून अधिक आहे. याच प्रवर्गातील दुसरा डोस महाराष्ट्रात 41 टक्के लोकांना देण्यात आला तर सहा राज्यात हे प्रमाण 45 टक्के हून अधिक आहे. ज्येष्ठ नागरिक या वर्गातील महाराष्ट्र 25 टक्के लसीकरण झाले आहेत. सुमारे चार राज्यात हे प्रमाण पन्नास टक्क्यांहून अधिक आहे. अशी इतर राज्यांशी लसीकरणाबाबत तुलना करत हर्षवर्धन यांनी महाराष्ट्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

दरम्यान राज्य सरकारला या महा संकटातून बाहेर पडण्यासाठी खूप काही करावं लागेल आणि त्यासाठी संपूर्ण मदत करण्याची केंद्राची तयारी आहे असं आश्वासन ही आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment