हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना काही केल्या आटोक्यात येत नसुन दररोज कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन केलं असून तरीही कोरोनाचा आलेख कमी होत नाही. राज्यात अजूनही दैनंदिन पातळीवर ५० हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे परिस्थिती हवीतशी नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे राज्यात लागू असलेल्या निर्बंधांच्या कालावधीत आणखी काही दिवस वाढ करावी लागू शकते, असं विधान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.
राज्यात 36 पैकी 12 जिल्ह्यांमध्ये कोरोना स्थिती कमी झाली असली तरी राज्यातील काही जिल्ह्या मध्ये कोरोना स्थिती वाढत आहे आणि अशीच स्थिती राहिली तर कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येईल. आणि त्याबाबत पंधरा तारखेच्या दरम्यान विचार करण्यात येईल असे राजेश टोपे म्हणाले आहेत.
दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासांत ५४ हजार २२ नवे रुग्ण आढळून आले होते. गेल्या काही दिवसांपासून राज्यतील नव्या कोरोना रुग्णवाढीची आकडेवारी ५० हजारांच्यावरच राहिलेली आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.