राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव; लॉकडाऊन होणार का?? राजेश टोपेंचं मोठं विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्नाटक, आणि गुजरात नंतर आता महाराष्ट्रात देखील ओमिक्रॉनचा (Omicron) शिरकाव झाला असून कल्याण डोंबिवली मधील एका 33 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान या नंतर राज्याच्या चिंतेत भर पडली असून या पार्श्वभूमीवर राज्यात लॉक डाउन लागणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत लॉकडाऊन लावणे हे परवडणारे नाही अस म्हंटल आहे.

राजेश टोपे म्हणाले, आपण जर काळजी घेतली नाही तर तिसरी लाट ओमायक्रॉनची देखील असू शकते, त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घ्यावं, मास्क काढू नये असं आवाहन टोपे यांनी केलं. तिसऱ्या लाटेसाठी राज्य सज्ज आहे पण सध्या निर्बंध किंवा लॉकडाऊन लावण्याचा कोणताही विचार नाही, तसं केल्यास लोकांना त्रास होईल, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवश्यक सर्व गोष्टींचा आढावा घेतला आहे. लहान मुलांना काय आवश्यक असेल त्याचाही आढावा घेऊन तयारी केली आहे. पण ही लाट येऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 85 टक्के पहिला तर 45-46 टक्के दुसरा डोस नागरीकांना दिलेला आहे. त्यामुळे दुसरा डोस नागरिकांनी तातडीने घ्यावा, असं देखील राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

Leave a Comment