पावसाळ्यात आजारी पडायचं नाही ना? मग या टिप्स फॉलो कराच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पावसाचा सिझन सुरू झालेलं आहे. पावसाळा आला की उष्णता पासून आपली सुटका होते खरी पण दुसरीकडे डेंगू मलेरिया यासारखे अनेक आजार देखील डोकं वर काढू लागतात. त्यामुळे याचा आपली रोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. या पावसाळ्याच्या सीझनमध्ये आपण आपल्या आहाराची आणि तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी काही टिप्स फॉलो करणे गरजेचे असून हे टिप्स पावसाळ्यात आपल्याला फिट राहण्यासाठी मदत करू शकतात.

1) उकळलेले पाणी प्या-

पावसाळ्यात नेहमी उकळलेला पाणी पिणे गरजेचे असतं. अनेकदा डॉक्टरही हाच सल्ला देत असतात. कारण बऱ्याचदा पावसाळ्यात गढूळ पाणी आल्यामुळे त्यातील कीटकनाशक, बारीक जिवाणू अशा पाण्यात आढळतात. त्यामुळे जर पाणी उकळून पिले तर आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम ठरते. त्याचबरोबर दररोज सकाळी गरम पाण्यात पाण्यात लिंबू टाकून पिले तर शरीरातील हानिकारक विषाणू निघून जातात .

2) स्ट्रीट फूड खाऊ नका –

पावसाळ्याच्या सीझनमध्ये खरं तर थंड वातावरणामुळे स्ट्रीट फूड खाण्याची प्रचंड इच्छा असते. परंतु त्यामध्ये असलेल्या हायजिनमुळे आजार वाढण्याची शक्यता जास्त असते . त्यामुळे कितीही मन करत असलं तरी पावसाळ्यात बाहेरचं खाणं टाळायला पाहिजे.

3) मिठाचा वापर टाळा-

मीठ हे जेवणात लागणार महत्वाचं पदार्थ आहे यात शंकाच नाही. जेवणात मीठच नसेल तर त्या जेवणाला काहीच अर्थ राहत नाही हे सुद्धा खरं आहे. परंतु पावसाळ्याच्या दिवसात जास्त प्रमाणात मीठ खाणं हानिकारक आहे. अन्नामध्ये जास्त मीठ असेल तर वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण मिळू शकते. त्यामुळे कमी मिठाचं अन्न खाणे गरजेचे आहे. जेणेकरून आपण आपल्या तब्येतीची काळजी घेऊ शकू.

4) कच्चे पदार्थ खाणे टाळा-

बऱ्याच सीजनमध्ये आपण कच्च्या पालेभाज्या जेवणात घेत असतो. परंतु पावसाळ्यामध्ये कच्चा भाजीपाला किंवा कच्चे पदार्थ खाणे अयोग्य आहे. कारण यामुळे मेटाबोलिजम वाढू शकतो. त्याचबरोबर जास्त वेळ ठेवलेली फळे सुद्धा पावसाळ्यात खाणं योग्य नाही.

5) आराम करा-

पावसाळ्यात आपली इम्युनिटी वाढावी यासाठी बरेच जण व्यायाम, वेगवेगळी योगासने, डाएट प्लॅन करतात. पण महत्वाची गोष्ट विसरून जातात. ती म्हणजेच आराम. या सर्व गोष्टींमुळे इम्युनिटी वाढते पण त्यासोबतच आराम करणे हे अति महत्त्वाचे असते. तसेच कमीत कमी ८ तास झोप घेणं आवश्यक असत.