येत्या 3 ऑगस्टपर्यंत राज्यातील ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

heavy rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या आठवडयात राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. मात्र या दोन दिवसात पावसाचा जोर कमी झाला होता. आता पुन्हा ३ ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पुन्हा कोसळणार असल्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावे असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

याबाबत पुणेचे विभागप्रमुख के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. सध्या राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि गोवा भागात ३ ऑगस्टपर्यंत पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच रत्नागिरी, रायगड, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांत ही ३ ऑगस्टपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी फक्त महत्त्वाच्या कामांसाठी बाहेर पडावे असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

https://twitter.com/Hosalikar_KS/status/1686314005240102912/photo/1

दरम्यान बांगलादेश किनार्‍यावर बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यामुळे ३ ऑगस्टपर्यंत रत्नागिरी, रायगड, सातारा आणि पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि गोवा भागात देखील पाऊस हजेरी लावेल. तत्पूर्वी शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. मध्यंतरी पडलेल्या मुसळधार पावसामुळे आधीच राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.