कोकणात तुफान पाऊस : कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | राज्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कोकणात पूरस्थिती निर्माण होवू लागली असताना कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे कोकणात अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅक, नदीकाठची मंदिरे, बंधारे पाण्याखाली गेली आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली जिल्ह्यातही मंगळवारी पहाटे पासून पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे आता शेतात पेरण्यास मोठ्या प्रमाणावर सुरूवात होणार आहे.

कोकणात सुरू असलेल्या पावसामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. रत्नागिरी- चिपळूण परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने येथे एनडीआरएफच्या टीम दाखल झालेल्या आहेत. तसेच या परिसराला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसापासून मुंबई- गोवा मार्गावरली परशुराम घाट बंद आहे. वैभववाडी येथे रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेलेले आहेत.

वेंगुर्ला येथे पावसाने जोरदार बॅंटींग केली असून मानशीश्वर मंदिर पाण्याखाली गेले आहे. राजापूरला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. त्यामुळे राजापूरात जलमय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीची पाणीपातळीत वाढ झाली आहे.

सेल्फी काढताना महिला पुराच्या पाण्यात पडली

सिंधुदुर्गातील आंबोली येथे पुरातील पाण्यातून वाहून जाणाऱ्या महिलेल्या वाचविण्यात यश आले आहे. आंबोली येथील हिरण्यकेशी नदीला पूर आलेला आहे. सेल्फी काढत असताना महिलेचा तोल जावून पडली होती. सुदैवाने तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी तात्काळ महिलेला वाचविले.

Leave a Comment