‘सेवा हेच संघटन’ : शेखर चरेगांवकर यांचेकडून उरुल व तळबीड येथील कोव्हीड सेंटरला मदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष व भारतीय जनता पक्षाच्या सहकार आघाडीचे राज्य सहसंयोजक शेखर चरेगांवकर यांनी व्यक्तीगत स्तरावर पाटण तालुक्यातील उरुल येथील कोव्हीड केअर सेंटरला ३० बेड सेट (गादी, बेडशीट, उशी व चादर) व कराड तालुक्यातील तळबीड येथील केअर सेंटरला ४० कॉट्स भेट दिल्या आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील सरकारला नुकतीच ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. देशभर सध्या कोव्हीड महामारीची गंभीर परिस्थिती असल्याने कोणतेही जाहीर कार्यक्रम व समारंभ न करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. याऐवजी देशभरातील कार्यकर्त्यानी आपल्या भागात ‘सेवा हेच संघटन’ या अभियाना अंतर्गत कोरोनाग्रस्तांची मदत करावी, असे आवाहन देशपातळीवर केले आहे.
या अभियाना अंतर्गत गरीब व गरजू लोकांना खाद्य साहित्याचे वितरण तसेच मास्क, सॅनिटायझर, ऑक्सिमिटर या वस्तूंचे वितरण तसेच लसीकरणासाठी लोकांना प्रोत्साहित करणे असे उपक्रम राबिविले जाणार आहेत.

या अभियानास प्रतिसाद देत शेखर चरेगांवकर यांनी उरुल व तळबीड येथील कोरोना केअर सेंटरला बेड व कॉट्सची मदत केली आहे. यामुळे सदर सेंटर अद्ययावत होण्यास मदत झाली आहे.
गावोगावी अशा उभ्या राहणाऱ्या केअर सेंटर्सना स्थानिक कार्यकर्त्यानी सर्वतोपरी मदत करून पक्षाने आवाहन केलेल्या ‘सेवा हेच संघटन’ या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यानिमित्ताने केले आहे. या मदतीबद्दल दोन्ही ग्रामपंचायत व स्थानिक शासकीय अधिकाऱ्यांनी चरेगांवकर यांचे आभार मानले आहेत.

Leave a Comment