हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मनसेचे राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ‘कोरोना परस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्याला कोरोनाची लस स्वतंत्रपणे खरेदी करू द्या’, अशी मागणीकेली आहे. त्यांच्यानंतर आता एका भाजप खासदारानेही पंतप्रधान मोदींना पत्र लिहले आहे. त्यामध्ये ‘ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी वायू सेनेची मदत द्या,’ अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. १४ एप्रिल २०२१ पासून रात्री ८ वाजेपासून १ मे २०२१ पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील आणि या काळात संपूर्ण संचारबंदी राहील.
अशा कोरोनाच्या महाभयंकर परिस्थितीत खासदार भावना गवळी यांनी ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी वायू सेनेची मदत द्या, अशी मागणी पंतप्रधान मोदींकडे पत्र लिहून केली आहे. खासदार गवळी यांनी नुसते पंतप्रधान मोदींनाच पत्र लिहले नसून गृहमंत्री राजनाथ सिंग यांनाहि पत्र लिहले आहे.
वायुसेनेच्या हेलिकॉप्टर, विमान द्वारे ऑक्सिजन लवकर पोहचविणे शक्य होईल. वाहनाने ऑक्सिजन साठा पोहचविण्यास वेळ जातो. त्याकरिता वायुसेनेच्या हवाई यंत्रणेची मदत दयावी, अशी मागणी खासदार गवळी यांनी केली आहे.