हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : RBI कडून गेल्या महिन्यात रेपो दरात दोन वेळा वाढ करण्यात आली. ज्यानंतर अनेक बँकांनी आपल्या कर्जाचे व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली. मात्र एकीकडे कर्जावरील व्याजदर वाढ असतानाच बँकांकडून डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ करण्यात आली आहे. यादरम्यान, आता इंडियन ओव्हरसीज बँकेने देखील आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने 2 कोटींपेक्षा कमी किंमतीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. 12 जुलैपासून बँकेचे हे नवे दर लागू केले जातील. Bank FD
बँकेच्या वेबसाइटनुसार, आता 1 वर्षापेक्षा जास्त आणि 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदर 5.40 टक्क्यांवरून 5.45 टक्के करण्यात आला आहे. 444 दिवसांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदर 5.45 टक्क्यांवरून 5.50 टक्के करण्यात आला आहे. याशिवाय इतर कोणत्याही कालावधीसाठी व्याजदरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. Bank FD
हे लक्षात घ्या कि, 8 जून 2022 रोजी, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दरात 50 बेस पॉईंट्सची वाढ केल्याची घोषणा केली. आता तो 4.40 टक्क्यांवरून 4.90 टक्के केला गेला आहे. याआधी 4 मे 2022 रोजी देखील RBI ने रेपो दर 40 बेसिस पॉईंट्सने वाढवून 4.40 टक्के केला होता. Bank FD
आता FD वरील व्याजदर वाढवण्याव्यतिरिक्त, इंडियन ओव्हरसीज बँकेने वेगवेगळ्या कालावधीसाठीच्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्येही 10 बेस पॉईंट्स म्हणजेच 0.10 टक्के वाढ केली आहे. ज्यामुळे आता बँकेकडून कर्ज घेणे महागणार आहे. 10 जुलै 2022 पासून बँकेचे हे नवीन दर लागू केले जातील. Bank FD
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bankbazaar.com/fixed-deposit/iob-fixed-deposit-rate.html
हे पण वाचा :
LPG दर वाढीमुळे बिघडले सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजट !!!
RBI ने ‘या’ को-ऑपरेटिव्ह बँकेवर घातली बंदी, यामागील कारण जाणून घ्या
Indian Overseas Bank चा ग्राहकांना धक्का !!! आता बँकेकडून कर्ज घेणे महागणार
आता PAN-Aadhaar Link करण्यास द्यावा लागणार दुप्पट दंड, त्यासाठीची प्रक्रिया तपासा
Home Loan : कोणत्या बँकेकडून कमी व्याजदरात होम लोन दिले जात आहे ते जाणून घ्या