हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI : गुंतवणुकीच्या लोकप्रिय प्रकारामध्ये फिक्स्ड डिपॉझिट्स पहिल्या क्रमांकावर आहे. याद्वारे निश्चित रिटर्न मिळतो. सध्याच्या काळात तर या वरील व्याज दरात चांगलीच वाढ झाली आहे. जर आपणही चांगल्या व्याजदरासाठी बँकेमध्ये FD करण्याचा विचार करत असाल तर SBI कडून आपल्याला एक चांगली संधी मिळत आहे. हे जाणून घ्या कि, स्टेट बँक ऑफ इंडियाकडून आपल्या नवीन एफडी स्कीम ‘अमृत कलश’ अंतर्गत ग्राहकांना 7.1% व्याज दिले जात आहे. त्याचबरोबर यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 7.6 टक्के व्याज देखील मिळणार आहे. मात्र या योजनेचा लाभ फक्त 31 मार्च 2023 पर्यंतच घेता येईल.
15 फेब्रुवारी रोजी SBI कडून ही स्पेशल FD स्कीम लाँच करण्यात आली आहे. जी 31 मार्च 2023 पर्यंतच उपलब्ध असेल. ही नवीन FD स्कीम 400 दिवसांच्या कालावधीसाठी असेल.
किती व्याज मिळेल???
SBI ने एका ट्विटमध्ये याबाबत माहिती देताना म्हटले की, “आकर्षक व्याजदरांसह 400 दिवसांच्या कालावधीच्या डोमेस्टिक आणि NRI ग्राहकांसाठी “अमृत कलश डिपॉझिट” ऑफर केली जात आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक करून 400 दिवसांच्या कालावधीमध्ये 1 लाख रुपयांच्या डिपॉझिट्सवर सर्वसामान्य ग्राहकांना एकूण 8,017 रुपये व्याज मिळेल तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी 8,600 रुपये मिळतील.
अशा प्रकारे करा अर्ज
15 फेब्रुवारी 2023 पासून सुरू झालेल्या या योजनेमध्ये 31 मार्च 2023 पर्यंत FD करता येणार आहे. तसेच या योजनेंतर्गत सर्वसामान्यांना 7.10 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याज मिळेल. त्याचबरोबर बँकेचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 1 टक्के जास्त व्याज दिले जात आहे. या एफडीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत जाऊन किंवा SBI YONO App वरूनही गुंतवणूक करता येईल.
ज्या लोकांना आपले पैसे फक्त 1 ते 2 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवायचे आहेत, अशा लोकांसाठी एसबीआय अमृत कलश योजना खूपच फायदेशीर आहे . यामध्ये गुंतवणूक करून ज्येष्ठ नागरिकांना मोठा नफा मिळेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/documents/136/1364568/140223-Amrit+Kalash.pdf/37f1fdf0-3ec3-7f09-fda8-82c2249d8b55?t=1676382394104
हे पण वाचा :
Credit Score म्हणजे काय ??? त्याचे महत्त्व जाणून घ्या
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आजही घसरणीचा कल, पहा आजचे नवीन भाव
Punjab and Sind Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, आता FD वर मिळणार 8% पेक्षा जास्त व्याज
‘या’ 5 कारणांमुळे आपण येऊ शकाल Income Tax डिपार्टमेंटच्या रडारवर, जाणून घ्या त्याविषयीची माहिती
Stock Market मधील अप्पर सर्किट अन् लोअर सर्किट काय असते ??? तपासा याचे नियम